Tata-Adani : ही सरकारी कंपनी कोणाच्या मालकीची? टाटा की अदाणी, कोण मारणार बाजी..

Tata-Adani : ही सरकारी कंपनी लवकरच देशातील प्रमुख उद्योगाकडे जाऊ शकते.

Tata-Adani : ही सरकारी कंपनी कोणाच्या मालकीची? टाटा की अदाणी, कोण मारणार बाजी..
कंपनीची मालकी कोणाकडे?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 7:58 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकार पुढील महिन्याच्या अखेरीस राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (RINL) आणि त्याच्या उपकंपन्यांसाठी एक्स्प्रेशन ऑफ इंट्रेस्ट (EoI) मागू शकते. या कंपनीच्या मालकीसाठी टाटा स्टील (Tata Steel), जेएसडब्लू स्टील (JSW Steel) आणि अदाणी समुहात (Adani Group) सरळसरळ टक्कर आहे. डिसेंबरच्या सुरुवातील या कंपन्यांनी हिस्सेदारीसाठी स्वारस्य दाखविले होते. ईटीने सूत्रांच्या माहिती आधारे ही बातमी दिली आहे. केवळ या तीन कंपन्याच नाही तर अजून 7 कंपन्या राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेडच्या खरेदीसाठी मैदानात आहेत. या कंपनीचे मूल्यांकन या डिसेंबर अखेर होण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे (DIPAM) सचिव तुहीन कांत पांडेय यांनी या कंपनीच्या विक्रीसंदर्भात प्रक्रिया सुरु असल्याचा दावा केला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वित्तविषयक समितीने जानेवारी, 2021 मध्ये RINL मध्ये निर्गुंतवणुकीला मान्यता दिली होती.

RINL आणि तिच्या उपकंपन्यांना तसेच संयुक्त उपक्रमातील संस्थांमध्ये सुद्धा केंद्र सरकार हिस्सेदारी विक्रीसाठी प्रयत्नशील आहे. सार्वजनिक क्षेत्रातील इस्पात कंपनी, RINL ला विशाखापट्टणम येथील विजाग स्टील या नाावानेही ओळखल्या जाते.

हे सुद्धा वाचा

ही कंपनी देशातील सर्वोत्तम 6 स्टील उत्पादक कंपन्यांमधील एक कंपनी आहे. या कंपनीची एकूण वार्षिक क्षमता 75 लाख टन आहे. वर्ष 2021-22 मध्ये या कंपनीची एकूण उलाढाल 28215 कोटी रुपये होती आणि कंपनीला 913 कोटींचा फायदा झाला होता.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सरकारच्या हिस्सेदारीचे व्यवस्थापन करणाऱ्या DIPAM ने यंदा मार्च महिन्यात निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी परवानगी मागितली होती. तसेच कंपनीच्या मूल्यांकनासाठी मूल्यांकनकर्ताच्या नियुक्तीचा प्रस्ताव मागितला होता.

पण हिस्सेदारी विक्रीचा हा प्रयत्न वाटतो तितका सोपा नाही. कामगार संघटना या निर्गुंतवणुकीला कडाडून विरोध करत आहेत. संघटनांनी खासगी उद्योग समूहाला ही कंपनी विक्री करण्यास विरोध दर्शविला आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) मध्ये RINL चे विलिनिकरण करण्याचा प्रस्ताव संघटनांनी दिला आहे. पण केंद्र सरकारने तो नाकारला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.