शेअर बाजाराचा झटका, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी स्वाहा, ही आहेत कारणं

Share Market | शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरु आहे. मंगळवरी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीत मोठी घसरण दिसून आली. बाजाराने गेल्या आठवड्यात पण बाजाराने उलटी चाल चालल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले. बाजाराने अचानक यूटर्न घेतल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले.

शेअर बाजाराचा झटका, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी स्वाहा, ही आहेत कारणं
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 4:55 PM

नवी दिल्ली | 19 March 2024 : शेअर बाजारात सध्या घसरणीचा काळ आहे. गेल्या काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये पडझड सुरु आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये 700 अंकांची घसरण दिसून आली. तर एनएसई निफ्टीमध्ये जवळपास 250 अंकांची घसरण दिसून आली. मंगळवारी निफ्टी 238.25 अंकांनी घसरुन 21,817.45 अंकावर बंद झाला होता. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 736.37 अंकांनी घसरुन 72,012.05 अंकांनी बंद झाला. दिवसभरातील व्यापारी सत्रात निफ्टी 21,978.30 अंकांनी तर सेन्सेक्स 72,490.09 अंक इतका वधारला. शेअर बाजारात सारखे हिंदोळे का येत आहे, सारखी पडझड का होत आहे, याचे कोडे सर्वांनाच पडले आहे.

या कारणामुळे बाजारात घसरण

  • जपानने गेल्या 17 वर्षांतील रेकॉर्ड मोडीत काढला. जपानची मध्यवर्ती बँक, बँक ऑफ जपानने उणे व्याज दराचे धोरण बदलवले आहे. त्यामुळे जगभरातील बाजारावर त्याचा विपरीत परिणाम दिसून आला. पण आशियतील बाजारावर त्याचा जास्त प्रभाव दिसून आला. त्यामुळे बाजारात विक्री सत्र सुरु झाले. जपानच्या पतधोरणानुसार, शॉर्ट टर्म किमान व्याज दर आतापर्यंत -0.10 टक्के ठेवण्यात येत होते. हा व्याजदर वाढून आता 0 ते 0.10 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • दुसऱ्या टोकावर अमेरिकेतील घडामोड पण बाजारावर दबाव टाकत आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या आगामी बैठकीत व्याजदरात कपातीचे संकेत मिळत आहे. अमेरिकेतील महागाईचे आकडे, रोजगाराचे आकडे यानंतर आता व्याजदराकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. 20 मार्च रोजी FOMC च्या बैठकीत व्याज दरात वाढीची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या बैठकीत फेडचे चेअरमन जेरोम पॉवेल, व्याज दरात बदल करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे आज बँकेच्या शेअरमध्ये पण विक्रीचे सत्र दिसून आले. तर फायनेन्शिअल शेअरमध्ये आज मोठी उसळी दिसून आली नाही.

बँक निफ्टीत जोरदार घसरण

हे सुद्धा वाचा

बँक निफ्टीत आज घसरण दिसून आली. त्याचा परिणाम सर्व बाजारावर दिसून येत आहे. बँक निफ्टीतील सर्व 12 शेअर आज एका मर्यादीत टप्प्यात ट्रेड करताना दिसले. सर्व मुख्य बंक शेअरमध्ये सुस्तीचे वातावरण दिसून आले. त्यामुळे बाजार थंडावलेला होता. बँक निफ्टीत सर्वाधिक विक्री झाली. अर्ध्यांहून अधिक घसरण झाल्याने बाजाराला मोठा फटका बसला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.