Share market updates : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांना मोठा दिलासा, शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 721 अकांनी वधारला

गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. गुरुवारच्या घसरणीनंतर आज मात्र शेअर बाजारात तेजीचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे.

Share market updates : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी गुंतवणूकदारांना मोठा दिलासा, शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 721 अकांनी वधारला
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 10:48 AM

मुंबई : गुरुवारी शेअर बाजारात (Share market) मोठी घसरण पहायला मिळाली होती. मात्र गुरुवारी झालेल्या घसरणीनंतर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज शेअर बाजारात मोठा फेरबदल पहायला मिळत आहे. शेअर बाजार वधारला असून, शेअर बाजार सुरू होताच निफ्टी (Nifty) आणि सेन्सक्समध्ये (Sensex) मोठी तेजी आली आहे. आज पहिल्या सत्रात सेन्सक्समध्ये 721 अंकांची वाढ झाली आहे. सेन्सक्स 1.37 टक्क्यांच्या वाढीसह 53514 अकांवर पोहोचला आहे. तर दुसरीकडे निफ्टी देखील 234 अंकांनी वधारला आहे. निफ्टी 1.48 टक्क्यांच्या वाढीसह 16043 वर पोहोचला आहे. आज बीएसई लिस्टेड सर्वच शेअर्समध्ये तेजी दिसत असून, सर्व कंपन्या या हिरव्या निशाणावर कारभार करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटवर विक्रीचा दबाव वाढल्याने शेअर मार्केटमध्ये पडझड सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र आज खरेदी वाढल्याने शेअर बाजारात सुधारणा दिसून येत आहे. सेन्सक्स आणि निफ्टी वधारल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा फटका

गेल्या काही दिवसांपासून भारतातीलच नाही तर जगभरातील शेअर मार्केटवर विक्रीचा दबाव वाढला आहे. शेअर मार्केटवर विक्रीचा दबाव वाढल्याने मंदीचे वातावरण आहे. यामागे प्रामुख्याने दोन कारणे आहेत. एक म्हणजे वाढती महागाई आणि दुसरे कारण म्हणजे जगभरातील मध्यवर्ती बँकांनी आपल्या देशातील रेपो रेट वाढवण्याचा लावलेला धडाका यामुळे शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. विक्रीचा दबाव वाढल्याने सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये गेल्या काही दिवसांत मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये बुडाले आहेत. दुसरीकडे आज मात्र शेअर बाजारात तेजी दिसून येत असल्याने गुंतवणूकदारांना थोडा दिलासा मिळाला आहे.

हे सुद्धा वाचा

एलआयसी गुंतवणूकदारांमध्ये धाकधूक

गुरुवारी एलआयसीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली होती. दरम्यान गुरुवारी झालेल्या घसरणीनंतर आज एलआयसीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी दिसून येत आहे. गुरुवारी एलआयसीचा शेअर्स 839 रुपयांपर्यंत खाली आला होता. आज त्यामध्ये थोडी सुधारणा होऊन तो 845 रुपयांवर पोहोचला आहे. एलआयसीच्या शेअरची इश्यू प्राईस 949 रुपये असून, सध्या हा शेअर्स इश्यू प्राइसच्या तुलनेत 104 रुपयांनी तोट्यात आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.