Rekha Jhunjhunwala : रेखा झुनझुनवाला यांनी विकले 5 कंपन्यांचे शेअर; टाटा समूहातील या Company चा पण समावेश

भारतीय शेअर बाजारातील बिल बूल राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेख झुनझुनवाला या काळाची पावलं ओळखून गुंतवणूक करणाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे. पण आता त्यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी या कंपन्यांमधील त्यांची हिस्सेदारी घटवली आहे

Rekha Jhunjhunwala : रेखा झुनझुनवाला यांनी विकले 5 कंपन्यांचे शेअर; टाटा समूहातील या Company चा पण समावेश
रेखा झुनझुनवाला यांनी शेअरची केली विक्री
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 3:58 PM

Rekha Jhunjhunwala Portfolio : रेखा झुनझुनवाला यांना देशातील दिग्गज गुंतवणूकदारांमध्ये मान आहे. शेअर बाजारातील हवसे-नवसे आणि गवसे यांची त्यांच्या पोर्टफोलिओवर बारीक नजर असते. त्या कोणत्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात. कुठली गुंतवणूक काढतात यावर सर्वसामन्य गुंतवणूकदारांचे लक्ष असते. आता रेखा झुनझुनवाला यांनी त्यांच्या पोर्टफोलिओत मोठा बदल केला आहे. त्यांनी टाटा समूहातील मोठी कंपनी टाटा कम्युनिकेशन्ससहित इतर 4 कंपन्यांमधील त्यांची हिस्सेदारी घटवली आहे. मार्चच्या तिमाहीत त्यांनी ही विक्री केली.

या 5 कंपन्यांमधील हिस्सेदारी केली कमी

माहितीनुसार, डिसेंबर तिमाहीच्या शेवटी रेखा झुनझुनवाला यांची टाटा कम्युनिकेशन्समध्ये 1.8 टक्क्यांचा वाटा होता. आता मार्च तिमाहीच्या शेवटी त्यांनी ही गुंतवणूक 1.6 पर्यंत घटवली आहे. याशिवाय त्यांनी राघव प्रोडक्टिव्हिटी एनहांसर्स (Raghav Productivity Enhancers), कॅनरा बँक (Canara Bank), फोर्टिस हेल्थकेअर (Fortis Healthcare) आणि एनसीसी (NCC) यामधील त्यांचा वाटा कमी केला आहे. त्यांचे पती राकेश झुनझुनवाला हे पण दिग्गज गुंतवणूकदार होते. त्यांना भारताचे वॉरेन बफे अशी पदवी होती.

हे सुद्धा वाचा

कारण तरी काय

ट्रेंडलाईन डेटानुसार, रेखा झुनझुनवाला यांची राघव प्रोडक्टिव्हिटीमधील वाटा आता केवळ 0.1 टक्के इतका उरला आहे. याशिवाय कॅनेरा बँक, फोर्टिस हेल्थकेअर आणि एनसीसीमध्ये त्यांनी 0.6 टक्के हिस्सा विक्री केला. वर्ष 2024 मध्ये सिलिका रॅमिंग मास तयार करणारी कंपनी राघव प्रोडक्टिव्हिटीचे शेअर 15 टक्क्यांपर्यंत खाली घसरलेले आहेत. अनेक गुंतवणूकदार या शेअरपासून चार हात लांब दूर आहेत. कॅनेरा बँकेने एका आर्थिक वर्षात चांगला परतावा दिला आहे. गेल्या 12 महिन्यात 100 टक्के तर या वर्षात या शेअरने 38 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. रेखा झुनझुनवाला यांची आता एनसीसीमध्ये 12.5 टक्के तर फोर्टिसमध्ये 4.1 टक्के हिस्सेदारी उरली आहे.

रेखा झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती 50,230 कोटी

रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओशी संबंधित ही माहिती मार्च तिमाहीच्या निकालाअंती समोर आली आहे. आता अनेक कंपन्यांचे निकाल समोर येतील. त्यानंतर त्यांच्या पोर्टफोलिओचे चित्र समोर येईल. त्यांची जवळपास 26 कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. त्यांची एकूण संपत्ती जवळपास 50,230 कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे टाटा मोटर्स, इंडियन हॉटेल्स, टायटन, नजारा टेक आणि डेल्टा कॉर्प सारख्या मोठ्या कंपन्यात हिस्सेदारी आहे.

Non Stop LIVE Update
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?.
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल.
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप.
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं..
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं...
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल.
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?
तावडेंकडून कोट्यावधींचं वाटप? ठाकूरांनी दाखवलेल्या 'त्या' डायरीत काय?.
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा
तावडेंना घेरलं, पैशांचं वाटप, भाजप-बविआमध्ये निवडणुकीपूर्वी तुफान राडा.
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले..
कालीचरण महाराजांची सभा? जरांग पाटलांवर जहरी टीका; संजय शिरसाट म्हणले...
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार
'टिकल्या, बुचड्या...', कालिचरण महाराजांची नक्कल करत जरांगेंचा पलटवार.