GST Collection : केंद्र सरकार पुन्हा मालामाल! डिसेंबरमध्ये मिळाला 15 टक्के जास्त जीएसटी, इतकी जमा झाली गंगाजळी
GST Collection : जीएसटीने केंद्र सरकार पुन्हा एकदा मालामाल झाले आहे.
नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत इतर कोणत्याही करापेक्षा जीएसटीने (GST revenues) केंद्र सरकारला मालामाल केले आहे. कोरोना काळानंतर जीएसटीने केंद्र सरकारच्या (Central Government) महसूलात विलक्षण भर पडली आहे. डिसेंबरमध्ये (December) जीएसटी महसूलात 15 टक्क्यांची वाढ झाली असून ही रक्कम 1.49 लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. जीएसटीमध्ये सातत्याने वाढ होण्याची परंपरा अबाधित राहिली आहे.
जीएसटी महसूल 1.40 लाख कोटींहून अधिक असण्याचा डिसेंबर हा सलग 10 वा महिना ठरला आहे. नोव्हेंबर महिन्यात जीएसटी महसूल वार्षिक आधारावर नोव्हेंबर महिन्यात 11 टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. नोव्हेंबर महिन्यातही 1.46 लाख कोटींहून अधिकचा महसूल जमा झाला होता.
? Rs 1,49,507 crore GST Revenue collected for December 2022, records increase of 15% Year-on-Year
? Monthly GST revenues more than Rs 1.4 lakh crore for 10 straight months in a row
Read more ➡️ https://t.co/jv2Xt76EZB pic.twitter.com/MNZaumpP1a
— Ministry of Finance (@FinMinIndia) January 1, 2023
एप्रिल महिन्यात जीएसटीने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले होते. एकट्या एप्रिल महिन्यात केंद्र सरकारच्या तिजोरीत 1.68 लाख कोटी रुपये जमा झाले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात दुसऱ्यांदा सर्वाधिक जीएसटी जमा झाला होता. या वर्षात सातत्याने जीएसटी वाढत आहे.
ऑक्टोबर महिन्यात 1.52 लाख कोटी रुपये जमा झाले होते. डिसेंबर 2022 मध्ये वस्तूंवरील जीएसटीवर महसूल 8 टक्क्यांहून अधिक होता. तर देशातंर्गत व्यवहारात सेवांवरील महसूलात 18 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीत मोठी गंगाजळी आली.
अर्थमंत्रालयानुसार, डिसेंबर 2022 मध्ये एकत्रित सकल जीएसटी महसूल 1,49,507 कोटी रुपये होता. यामध्ये सीजीएसटी 26,711 कोटी रुपये, एसजीएसटी 33,357 कोटी रुपये, आयजीएसटी 78,434 कोटी रुपये आणि उपकरातून 11,005 कोटी रुपये जमा झाले होते.
डिसेंबर 2021 मध्ये प्राप्त महसूलात वस्तूंच्या आयात महसूल यावेळी 8% हून अधिक होता. तर देशांतर्गत महसूलात 18% हून अधिक होता. या करामुळे केंद्र सरकारला मोठा फायदा झाला आहे. या करातून सरकारच्या महसूलात मोठी वाढ झाली आहे.