GST Collection | सरकारला जीएसटी पावला! इतक्या कोटींची गंगाजळी झाली जमा
GST Collection | वस्तू आणि करामुळे सरकारची तिजोरी पुन्हा भरली आहे. ऑगस्ट महिन्यात वार्षिक आधारावर जीएसटी संकलनात 28 टक्क्यांची वाढ झाली. एकूण कर संकलन 1.40 लाख कोटी रुपये झाले आहे.
GST Collection | वस्तू आणि सेवा कर (Goods and Service Tax) केंद्र सरकारला पावला आहे. ऑगस्ट महिन्यात तिजोरीत 1.40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त GST संकलन झाले. सरकारने ऑगस्ट महिन्याची आकडेवारी जाहीर केली आहे. या महिन्यात सरकारने जीएसटी संकलनाद्वारे (GST Collection) 1,43,612 कोटी रुपये जमा केले आहेत. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत यंदा कर संकलन 28 टक्क्यांनी जास्त आहे. सलग 6 महिन्यांत, सरकारकडे 1.40 लाख कोटींहून अधिकचा कर जमा झाला आहे. गेल्या पाच वर्षांतील जीएसटीचा प्रयोग सरकारला चांगलाच फायदेशीर ठरला आहे. तरीही अनेक क्षेत्र आणि अनेक उत्पादने जीएसटीच्या परीघाबाहेर (Out of GST Circumference) आहेत. ही सर्व क्षेत्रे जीएसटीत आल्यावर केंद्र सरकारच्या गंगाजळीत पैशांचा ओघ सुरुच राहिल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
मार्चपासूनची आकडेवारी
वस्तू आणि सेवा कराने केंद्र सरकारला (Central Government) मालामाल केले आहे. सलग सहाव्या महिन्यात जीएसटी संकलन 1.4 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. जुलै महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या मदतीने एकूण 1.49 लाख कोटी रुपये सरकारी तिजोरीत (Government Treasury)आले. जीएसटी संकलनातून यापूर्वी जूनमध्ये 1.44 लाख कोटी, मे महिन्यात 1.40 लाख कोटी, एप्रिलमध्ये 1.67 लाख कोटी आणि मार्चमध्ये 1.42 लाख कोटींची गंगाजळी जमा झाली होती. ऑगस्ट महिन्यात तिजोरीत 1.40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त GST संकलन झाले.
? ₹1,43,612 crore gross GST revenue collected in month of August 2022
? Revenues for August 2022 28% higher than the GST revenues in the same month in 2021
? Monthly GST revenues more than the ₹ 1.4 lakh crore for six months in a row
Read more ➡️ https://t.co/wmSCYdWQ5o pic.twitter.com/EcoNDeuMPF
— Ministry of Finance (@FinMinIndia) September 1, 2022
जीएसटीच्या कक्षा रुंदावल्या
अलीकडे, जीएसटी परिषदेने अशा अनेक उत्पादनांवर आणि सेवांवर वस्तू आणि सेवा कर लागू केला आहे. अनेक वस्तू आणि सेवा जीएसटीच्या कर कक्षात आणल्या. त्यावर आता जीएसटी आकारण्या येत आहे. त्याचा ही परिणाम कर संकलनात दिसून येतो. हॉटेलचे भाडे, खासगी रुग्णालयातील 5,000 रुपयांपेक्षा जास्त एसी रुम यावर जीएसटीचा आकार लागू असेल. एवढेच नाही तर त्यातही 12 ते 18 टक्क्यांची श्रेणी आहे. त्यानुसार ग्राहकांना जीएसटी द्यावा लागणार आहे. पॅक, सीलबंद खाद्यपदार्थांवरही 5 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.
असा आला पैसा
ऑगस्टमध्ये एकूण GST महसूलापैकी CGST संकलन 24,710 कोटी रुपये होते. SGST कलेक्शन 30,951 कोटी रुपये आणि IGST कलेक्शन 77,782 कोटी रुपये होते. सेस 10,168 कोटी रुपये होता, ज्यात ऑगस्टमध्ये वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या 1,018 कोटी रुपयांचा समावेश आहे. नियमित सेटलमेंटनंतर ऑगस्ट 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल CGST साठी 54,234 कोटी रुपये आणि SGST साठी 56,070 कोटी रुपये आहे.