GST On Rent : घरभाड्याच्या सुखावर कराचे विरजन? Rent वर खरंच मोजावा लागेल का 18% GST? केंद्र सरकारची भूमिका काय..
GST On Rent : घर भाडे हे काहींसाठी कमाईचे साधन असते, त्यावर केंद्र सरकार कर आकारणार का?
नवी दिल्ली : जीएसटी परिषदेने (GST Council) मागे एकदा केलेल्या वक्तव्याने घर मालकांवर संक्रांत आली होती. घरभाड्यावर (GST On Rent) 18 टक्के कर आकारण्याची शिफारस जीएसटी परिषदेने केली होती. त्यानंतर घरमालकांच्या तोंडचे पाणी पळाले होते. त्यानंतर आता पुन्हा हा मुद्दा समोर आला आहे. विशेष म्हणजे घर मालकांना जीएसटी भाडेकरुंकडून वसूल करता येणार नाही, असे परिषदेने स्पष्ट केल्याचा मॅसेज समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला. आता पत्र सूचना कार्यालयाने (PIB) याविषयीचा फॅक्ट चेक केला आहे.
पीआयबीच्या तपासणीत (PIB Fact Check) याविषयीची माहिती समोर आली. त्यानुसार, ज्या मालमत्तेचा, संपत्तीचा वापर व्यावसायासाठी होतो, त्यांनाच केवळ हा 18 टक्के जीएसटीचा नियम लागू आहे. त्यामुळे व्यावसायिक वापरासाठी जर तुम्ही जागा भाड्याने दिली नसेल तर हा नियम तुम्हाला लागू नाही.
जीएसटी रजिस्टर्ड कंपनीला जागा व्यावसायिक उद्देशाने भाड्याने दिल्यास त्यांना 18 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. पण जर एखादी व्यक्ती स्वतःसाठी वा कुटुंबासाठी घर भाड्याने घेत असेल तर त्याला जीएसटी द्यावा लागणार नाही.
Claim: 18% GST on house rent for tenants #PibFactCheck
▶️Renting of residential unit taxable only when it is rented to business entity ▶️No GST when it is rented to private person for personal use ▶️No GST even if proprietor or partner of firm rents residence for personal use pic.twitter.com/3ncVSjkKxP
— PIB Fact Check (@PIBFactCheck) August 12, 2022
यापूर्वी झालेल्या बैठकीत जीएसटी परिषदेने याविषयीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हा निर्णय समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्यामध्ये आता कोणत्याही भाडेकरुला 18 टक्के वस्तू व सेवा कर मोजावा लागणार अशी माहिती देण्यात आली होती.
या मॅसेजमुळे घरमालकांसह भाडेकरुंमध्ये चिंतेच वातावरण तयार झाले. पण केवळ व्यावसायिक वापरासाठी जागेचा वापर होत असेल तरच, किरायावर 18 टक्के जीएसटी मोजावे लागेल, हे केंद्र सरकारने स्पष्ट केले. म्हणजे राहण्यासाठी जागेचा वापर होत असले तर जीएसटी भरण्याची गरज नाही.
कर तज्ज्ञांचे मते, घर भाड्याने घेताना एक बाब लक्षात ठेवा की, भाडेकरुने जर एखादी संस्था वा कंपनी जीएसटी नोंदणीकृत केली असेल आणि त्याच जीएसटी क्रमांका आधारे तो भाडे देत असेल तर 18 टक्के जीएसटी द्यावा लागेल.