India GDP Growth | जीडीपीत हनुमान उडी, तरी भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीबाबत का आहे साशंकता..

India GDP Growth | भारतीय अर्थव्यवस्थेत जोरदार तेजी आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनात भारताने जागतिक आव्हानांचा सामना करत प्रगती खेचून आणली असतानाही काही आंतरराष्ट्रीय संस्थांना अर्थव्यवस्थेवर विश्वास नाही.

India GDP Growth | जीडीपीत हनुमान उडी, तरी भारतीय अर्थव्यवस्थेच्या वृद्धीबाबत का आहे साशंकता..
अंदाज कमी Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 6:57 PM

India GDP Growth | भारतीय अर्थव्यवस्थेत जोरदार तेजी आहे. सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) भारताने जागतिक आव्हानांचा सामना करत प्रगती खेचून आणली असतानाही काही आंतरराष्ट्रीय संस्थांना अर्थव्यवस्थेवर विश्वास नाही. अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) या आठवड्यात जून तिमाहीचे सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे (Q 1 GDP Data) आकडे जाहीर केले आहेत. या अधिकृत आकड्यानुसार, जागतिक आव्हानांचा सामना करताना भारताने यशश्री खेचून आणला आहे. भारताचा जीडीपी ग्रोथ रेट 13.5 टक्के राहिला. गेल्या आर्थिक वर्षाचा विचार करता हा आकडा फार मोठा आहे. हा आकडा समोर आल्यानंतर जागतिक स्तरावरील अनेक वित्तीय मुल्यांकन संस्थांनी भारताच्या वृद्धीवर साशंकता व्यक्त केली आहे. त्यांनी भारताची जीडीपी ग्रोथ कमी असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

या संस्थांचा नाही विश्वास

भारतीय अर्थव्यवस्थाने तुफान वेगाने विकासदर गाठला. गेल्या वर्षीपेक्षा अनपेक्षित उडी मारली. पण या आंतरराष्ट्रीय Goldman Sachs, Citi groups, Moody’s संस्थांसह SBI ने जीडीपी ग्रोथ कमी राहिल असा अंदाज व्यक्त केला आहे.

काय आहे म्हणणे

Goldman Sachs च्या आकड्यांनी पुढील आर्थिक वर्षांसाठी भारताच्या प्रगतीला खिळ बसेल असे वक्तव्य केले आहे. त्यानुसार जीडीपी ग्रोथ ही केवळ 7.2 टक्के राहिल असा त्यांचा अंदाज आहे. भारतीय अर्थतज्ज्ञ शांतनु सेनगुप्ता यांच्यामते जून तिमाहीतील आकडे अपेक्षे इतके नक्कीच नाही.

हे सुद्धा वाचा

इतकी कमी

सेनगुप्ता यांच्या मते विकासदरात 3.3 टक्क्यांची घसरण झाली आहे. ही वृद्धी म्हणावी तशी नाही. मार्च तिमाहीचा ग्रोथ रेट हा डिसेंबर 2021 च्या तिमाहीच्या तुलनेत 0.5 टक्के जास्त राहिल्याचा दावा त्यांनी केला.

सिटीग्रुपचं म्हणणं काय

सिटीग्रुपने अगोदर 8 टक्के वृद्धी नोंदवली होती. पण त्यानंतर त्यांनी भारताचा वृद्धी दर 6.7 टक्के असेल असा अंदाज वर्तवला. त्यामागे अनेक कारणे देण्यात आली.

मूडीजचा मूड काय

मूडीजने ग्रोथ रेट अगोदर 8.8 टक्के नोंदवला होता. तो त्यांनी घटवला आणि आता 7.7 टक्के वृद्धी दर असेल असा त्यांचा कयास आहे.

ही आहेत कारणं

वाढता व्याजदर, पावसाचा लहरीपणा, जागतिक बाजारपेठेतील मंदी यामुळे भारताच्या तिमाही उत्पन्नावर आणि वृद्धीवर मोठा परिणाम होणार असल्याचा दावा या संस्थांनी केला आहे. आता अर्थव्यवस्था त्यांना काय उत्तर देते हे लवकरच स्पष्ट होईल.

आरबीआयपुढे आव्हान

मूडीजने ग्लोबल मॅक्रो आऊटलूकमध्ये सांगितले की, आरबीआयपुढे अनेक आव्हाने आहेत. त्यात महागाई थोपवण्यासह स्थिरता टिकवणे ही महत्वाची आव्हाने आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.