Gold Silver Price Update : खरेदीदारांना अक्षय संधी! सोने-चांदीचा स्वस्ताईचा मुहूर्त
Gold Silver Price Update : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेपूर्वीच आनंदवार्ता आली आहे. खरेदीदारांना अक्षय संधी मिळाली आहे. जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव..
नवी दिल्ली : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेपूर्वीच आनंदवार्ता आली आहे. आठवडाभरात एक दिवस सोडला तर सोने-चांदीची पडझड खरेदीदारांच्या पथ्यावर पडली आहे. दोन मौल्यवान धातूंच्या माघारीमुळे गुंतवणूकदारांना खरेदीचा मुहूर्त साधता येणार आहे. गेल्या काही महिन्यापासून सोने-चांदीच्या किंमतींनी (Gold Silver Price Update) घामाटा फोडला होता. सोने घसरुन 60000 प्रति 10 ग्रॅमवर पोहचले तर चांदीत घसरण होऊन तिचा भाव 75000 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला. आज खरेदीदारांना स्वस्ताईचा मुहूर्त साधता येणार आहे.
इतकी झाली घसरण या व्यापारी हप्त्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोने (Gold Price Update) 425 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले. हा भाव 60191 रुपये प्रति तोळ्यावर पोहचले. शुक्रवारी चांदीच्या किंमतीत घसरण झाली. चांदी 74773 रुपये प्रति किलो पर बंद झाली होती. आयबीजेए, शनिवार आणि रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी भाव जाहीर करत नाही.
14 ते 24 कॅरेट सोन्याचे भाव 24 कॅरेट सोने 425 रुपयांनी स्वस्त होऊन 60191 रुपये, 23 कॅरेट सोने 423 रुपयांनी घसरुन 59950 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या किंमती 389 रुपयांनी कमी होऊन 55135 रुपये, 18 कॅरेट सोने 319 रुपयांनी स्वस्त होऊन 45143 रुपये, तर 14 कॅरेट सोने 248 रुपयांनी स्वस्त होऊन 35212 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारातील आणि जागतिक बाजारपेठेतील सोने-चांदीचा भाव हा कोणत्याही कराविना जाहीर होतो. पण देशात सोने आयात केल्यानंतर त्यामध्ये विविध कर,शुल्क यांचा समावेश करण्यात येतो. त्यामुळे भावात तफावत दिसून येते.
सोने-चांदीत स्वस्ताई सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा 689 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त झाले आहे. 2 फेब्रुवारी 2023 नंतर 5 एप्रिल 2023 रोजी सोन्याने सर्वाकालीन उच्चांक गाठला होता. त्यादिवशी सोने 61,000 रुपयांच्या घरात पोहचले होते. चांदीत 5207 रुपये प्रति किलो घसरण झाली. चांदीने 79980 रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला आहे.
संध्याकाळपर्यंत किंमतीत वाढ होण्याची शक्यता गुडरिटर्न्सनुसार, 21 एप्रिल रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 200 रुपयांची पडझड झाली. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56,000 रुपये तर 24 कॅरेट एक तोळ्याचा भाव 230 रुपयांनी घसरुन भाव 61,080 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. 22 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रापेक्षा संध्याकाळच्या सत्रात भावात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
11 वर्षांत भाव डबल
- गेल्या 11 वर्षांतील भावांवर नजर टाकल्यास किती फायदा झाला हे स्पष्ट होईल. सोन्याचा भाव डबल झाला आहे.
- 24 एप्रिल 2012 रोजी अक्षय तृत्तीयेला सोन्याचा भाव 29,030 रुपये प्रति 10 ग्रॅम होता
- 13 मे 2013 रोजी अक्षय तृत्तीयेला एक तोळा सोन्याचा भाव 29,865 रुपये होता
- एका वर्षांत ग्राहकांना केवळ 2.88 टक्क्यांचा परतावा मिळाला
- चांदीने या काळात ग्राहकांना फटका दिला. चांदी जवळपास 19 टक्क्यांनी स्वस्त झाली
- चांदी 56,697 रुपयांहून 45,118 रुपये किलो झाली. 10,579 रुपये प्रति किलोने चांदी स्वस्त झाली
भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.