Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market : शेअर बाजार गेला हरखून, 5 महिन्यांतील मरगळ टाकली झटकून

Share Market : शेअर बाजाराने बऱ्याच दिवसांची मरगळ झटकली आहे. त्यामुळे भारतीय गुंतवणूकदाराचा आनंद आज गगनात मावला नाही. या तेजीमागील कारणं तरी काय..

Share Market : शेअर बाजार गेला हरखून, 5 महिन्यांतील मरगळ टाकली झटकून
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 7:42 PM

नवी दिल्ली : शेअर बाजार (Share Market) आणि गुंतवणूकदारांसाठी शुक्रवार अत्यंत जोरदार राहिला. BSE सेन्सेक्स 629 अंकांनी वधारुन 62,501 अंकावर बंद झाला. आज सकाळी बाजार सपाट होता. NSE वर निफ्टीने 178 अंकांची उसळी घेतली, निफ्टी (Nifty) 18,499 अंकावर बंद झाला. आज सार्वजनिक क्षेत्रातील बँका, आयटी, एफएमसीजी, मीडिया आणि मेटलमधील कंपन्यांनी आगेकूच केली. तसेच इतर सर्वच क्षेत्रात आज हिरवळ पसरल्याने गुंतवणूकदारांना कमाईची चांगली संधी मिळाली. रिलायन्स, हिंडाल्को, एचसीएल टेकचे शेअर वधारले तर ओएनजीसी आणि ग्रासिमचे शेअर घसरले.

दुसऱ्या दिवशी तेजीचे सत्र शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजीचे सत्र दिसून आले. यापूर्वी गुरुवारी निर्देशांक 98.84 अंकांनी वधारला. तर निफ्टीने 35.75 अंकांची आगेकूच केली होती. सेन्सेक्समधील सहभागी 30 कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीजने सर्वाधिक 2.79 टक्क्यांची वृद्धी नोंदवली. आजच्या व्यापारी सत्रात रिलायन्स, सन फार्मा हिंडाल्को आणि एचयुएलमध्ये प्रत्येकी 2% टक्क्यांची वृ्द्धी दिसून आली. तर HCL Tech, Divi’s Lab आणि Wipro यांनी छपाई केली. ONGC ने निराश केले. ग्रासिममध्ये पण गुंतवणूकदारांच्या हाती काही लागले नाही.

या शेअरमध्ये तेजीचे सत्र सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचसीएल टेक्नोलॉजीज, विप्रो, टेक महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील आणि टायटनच्या शेअरमध्ये वाढ दिसून आली. तर दुसरीकडे भारती एअरटेल, पॉवर ग्रिड आणि एनटीपीसीचे शेअर आपटले. परदेशी गुंतवणूकदारांनी 589.10 कोटी रुपये मूल्य असलेल्या शेअरची खरेदी केली.

हे सुद्धा वाचा

परदेशी बाजार चमकले आशियातील इतर सेअर बाजार, दक्षिण कोरीयाचा कॉस्पी, जपानचा निक्की आणि चीनच्या शंघाई कंपोजिटमध्ये आज तेजी दिसून आली. युरोपातील बाजारात सुरुवातीला सुस्ती दिसली. एक दिवसा पूर्वी अमेरिकेतील बाजारात तेजीचे सत्र होते. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा भारतीय बाजाराकडील ओढा कायम आहे.

मल्टिबॅगर स्टॉकने उघडले नशीब एसजी फिनसर्व (SG FinServ Stock) या या मल्टिबॅगर स्टॉकने (Multibagger Return) जोरदार परतावा दिला. अवघ्या 3 वर्षांत या स्टॉकने गुंतवणूकदारांना करोडपती केले. तीन वर्षांत या शेअरने 25407 टक्क्यांचा परतावा दिला. तर दोन वर्षांत या शेअरने 28130 टक्क्यांचा परतावा दिला. तीन वर्षांपूर्वी हा स्टॉक अवघ्या 2 रुपयांना होता. आता या पेन्नी स्टॉकची किंमत 714 रुपयांच्या घरात गेली आहे.

उच्चांक गाठला गुरुवारी या शेअरला अप्पर सर्किट लागले. हा स्टॉक 52-आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर, 714.20 रुपयांवर पोहचला. गेल्या पाच कारभारी सत्रात या शेअरचा भाव 23 टक्क्यांनी वधारला. ही कंपनी बँकिंग गुंतवणूक आणि निधी व्यवस्थापनाशी संबंधित आहे.

इतका झाला नफा एसजी फिनसर्वचे मार्केट कॅम्प 2,950 कोटी रुपयांचे आहे. कंपनीने 2023 मधील मार्च तिमाहीत 14.05 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. गेल्या वर्षी समान तिमाहीत या कंपनीने 0.69 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीत प्रमोटरचा हिस्सा 50.88 टक्के आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांकडे 49.12 टक्के वाटा आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.