RBI : अरे व्वा, नववर्षालाचा येऊन धडकली आनंदवार्ता! रिझर्व्ह बँकेची मनाला उभारी, उभारा आनंदाची गुढी

RBI : नवीन वर्षात आनंदवार्ता येऊन धडकली आहे. जागतिक घडामोडी घडत असताना रिझर्व्ह बँकेने भारतीयांच्या मनाला मोठी उभारी दिली आहे. आरबीआयने आनंदाची गुढी उभारली आहे.

RBI : अरे व्वा, नववर्षालाचा येऊन धडकली आनंदवार्ता! रिझर्व्ह बँकेची मनाला उभारी, उभारा आनंदाची गुढी
वेग राहील कायम
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 10:18 AM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने या नवीन वर्षांत आनंदवार्ता आणली आहे. आरबीआयच्या बुलेटिनमध्ये (RBI Bulletin) देशातील नागरिकांना दिलासा दिला आहे. अमेरिकेसह युरोपात मोठी उलथापालथ सुरु आहे. रशियाने युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जगात महागाईला (Inflation) खतपाणी मिळत आहे. अनेक बँका धडाधड बंद पडत आहेत. अमेरिकेत महागाई वाढली आहे. श्रीलंकेनंतर पाकिस्तानची अवस्था वाईट आहे. पण सध्या भारतीय अर्थव्यवस्था मार्गाक्रमण करत आहे. अनेक एजन्सीजने भारतीय आर्थिक विकासाचा दर (Growth Rate) कमी असेल असा दावा केला आहे. पण आरबीआयच्या बुलेटिनमध्ये जोरदार दावा केला आहे.

रिझर्व्ह बँकेने बुलेटिनमध्ये दिलासा दिला आहे. जागतिक अर्थव्यवस्था सुस्तावली असताना भारताची चिंता वाढलेली आहे. परंतु, आरबीआयने ही चिंता मिटवली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेसारखी भारतीय अर्थव्यवस्था सुस्तावणार नाही, असा दावा आरबीआयने केला आहे. आरबीआयने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये वृद्धी दर जोरदार असेल, असा दावा केला आहे. हा वेग कायम राहील, असे सांगितले आहे.

आरबीआयचा दावा

हे सुद्धा वाचा

जागतिक अर्थव्यवस्थेसारखी भारतीय अर्थव्यवस्था सुस्तावणार नाही. या आर्थिक वर्षातही वृद्धी दर कायम राहील, असा दावा आरबीआयने केला आहे. रिझर्व्ह बँकेने मार्च महिन्यातील बुलेटिनमध्ये एक लेख प्रकाशित केला आहे. त्यात आर्थिक अंदाज आकडेवारीसह मांडला आहे. अनेक अडचणी, समस्या असल्या तरी आरबीआय भारताविषयी आशावादी असल्याचा त्यात दावा करण्यात आला आहे.

मंगळवारी आरबीआयने याविषयीचे बुलेटिन प्रसिद्ध केले आहे. फेब्रुवारीच्या शेवटी आर्थिक वृद्धीबाबतचे आकडे जगातील इतर देशांच्या तुलनेत जोरदार आहेत. ही आकडेवारी भारताची मजबुत स्थिती दर्शवत असल्याचा दावा बुलेटिनमध्ये करण्यात आला आहे. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यात स्थानिक घटक असल्याचा दावा करण्यात आला आहे. वर्ष 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था आणि अनेक देशांच्या वृद्धी दरावर जागतिक मंदीचे सावट दिसू शकते. पण भारतीय अर्थव्यवस्थेने या विपरीत परिस्थितीत अधिक वेगाने आणि नेटाने मार्गक्रमण केल्याचा दावा आरबीआयने केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामहीपासून वृद्धी दर तेजीत असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर मायकल देवव्रत पात्रा यांच्या नेतृत्वाखालील एका टीमने हा लेख लिहिला आहे. या लेखकांच्या दाव्यानुसार, भारताचा जीडीपी वास्तविक म्हणजेच स्थिर किंमतीत पुढील आर्थिक वर्षात 170.9 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर 2022-23 आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी 159.7 लाख कोटी रुपये होऊ शकतो असा अंदाज आहे. लेखातील दाव्यानुसार, जागतिक अर्थव्यवस्थेचा एकदम परिणाम भारतावर दिसणार नाही. भारत त्याचा ग्रोथ रेट कायम ठेवेल. भारत, अर्थव्यवस्थेविषयी आरबीआय प्रचंड आशावादी आहे. पण शेवटी हे लेखकांचे विचार असून भारतीय रिझर्व्ह बँके या विचारांचे प्रतिनिधीत्व करत नाही, असे म्हणत आरबीआयने बाजू सावरण्याच प्रयत्न केला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.