2010 पासून विकतोय चहा; असे पालटले नशीब? Dolly चहावाल्याची Success Story

Dolly Chaiwala Success Story | माणसाचे नशीब पालटंत, हे नागपूर येथील डॉली चहावाल्याच्या सध्याच्या वलयातून तुम्हाला लक्षात आलंच असेल. यत्न तो देव जाणवा, असे आपल्याकडे उगाच, खोटखोटं लिहून ठेवलंय का? तर नाही. जाणून घ्या त्याची ही सक्सेस स्टोरी?

2010 पासून विकतोय चहा; असे पालटले नशीब? Dolly चहावाल्याची Success Story
Dolly Chaiwala ची यशोगाथा
Follow us
| Updated on: Mar 15, 2024 | 3:45 PM

नवी दिल्ली | 15 March 2024 : मध्यंतरी बागेश्वर बाबाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता, त्यात एक तरुण त्यांना सक्सेसफूल व्हायचे असल्याची विनंती करतो. त्यावर बाबा त्याची फिरकी घेत कान उघडणी करतात. नागपूरच्या Dolly Chaiwala हा एका दिवसात स्टार झाला असला तरी त्यामागे त्याची दोन दशकांहून अधिकची मेहनत आहे, हे वेगळं सांगायला हवं का? आता प्रत्येकाला झटपट यशस्वी व्हायचे आहे. त्याला Dolly Chaiwala हे अनोखे उत्तर म्हणावे लागेल. बिल गेट्सने या नागपूरकर चहावाल्याचा व्हिडिओ शेअर केल्यावर सगळ्यांनाच सूखद धक्का बसला. आपल्या हातच्या चहाचा अस्वाद दस्तूरखुद्द बिल गेट्स सारख्या जागतिक व्यक्तीने घेतल्याचे डॉलीच्या तर गावी पण नव्हते. कशी आहे त्याची यशोगाथा…

आणि डॉलीभाई रातोरात स्टार झाला

हे सुद्धा वाचा

बिल गेट्सने डॉलीच्या हातच्या चहाची चव चाखली. तो जाम खूश असल्याचे व्हिडिओतून दिसून येते. रंगीत चष्मा, चमकदार शर्ट, स्टायलिश हेअरकट, अशा युनिक अंदाजात डॉली’ चहावाला आज देशातच नाही तर जगात फेमस झाला आहे. तो यापूर्वी पण सोशल मीडियावर या स्टाईलमुळे चर्चेत होता. पण यावेळी त्याचे नशीबच पालटले. बिल गेट्सने त्याचा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याच्यावर युझर्सच्या उड्या पडल्या. कित्येक दशलक्ष युझर्सने हा व्हिडिओ लाईक केला.

स्टाईल नको कष्ट बघा

दरम्यान डॉली चहावाल्याने पण त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्याने 2010 साली चहा विक्री सुरु केल्याचे सांगितले. व्हिडिओच्या टेक्स्टमध्ये युझर्सला 31 डिसेंबर 2010 ही तारीख पण स्पष्ट दिसेल. त्यात डॉली त्याचा हटके चष्मा, लांब केसांमध्ये चहा तयार करताना आणि तो ग्राहकांना देताना दिसून येतो. आज बिल गेट्ससोबतच्या डॉलीचा प्रवास या व्हिडिओतून समोर आणण्यात आला आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे, हे डॉली चहावाल्याच्या यशोगाथेतून समोर आले आहे.

  1. डॉलीची एक दिवसाची कमाई तरी किती – IMDB Stars Portal नुसार, डॉली चहा विक्रीतून एका दिवसात 2500 रुपये ते 3500 रुपयांपर्यंत कमाई करतो. डॉली एक कप चहाच्या विक्रीतून 7 रुपयांची कमाई करतो. तो दररोज जवळपास 400 कप चहा विक्री करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉलीची एकूण संपत्ती 10 लाख रुपये आहे.
  2. इयत्ता 10 नंतर सोडले शिक्षण – डॉली चहावाला 16 वर्षांपासून नागपूरमध्ये चहाची टपरी चालवतो. चहाच्या चक्करमध्ये त्याने शिक्षण अर्धवट सोडले. इयत्ता 10 नंतर त्याने शिक्षण सोडले. अनेक लोक त्याच्या चहाचे चाहते आहेत. चहाच्या टपरीतून तो चांगली कमाई करतो. बिल गेट्सने त्याच्या हातची चहा पिऊन, त्याला मनमुराद दाद दिल्यानंतर अनेक जण त्यांच्या टपरीवर खास चहा पिण्यासाठी येतात.
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.