Mukesh Ambani : इशिता साळगावकर नाव ऐकलं आहे का? भारतातील दिग्गज अब्जाधीशांना देते टक्कर, मामा मुकेश अंबानी यांची आहे लाडकी

Mukesh Ambani : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची भाची इशिता साळगावकर हे नाव तसे फारसे परिचित नाही. पण भारतातील अनेक दिग्गज अब्जाधीशांना कमाईच्या बाबतीत साळगावकर टक्कर देते. ती मुकेश अंबानी यांची भाची आहे. अनेक सेवाभावी प्रकल्पात तिचा सहभाग आहे.

Mukesh Ambani : इशिता साळगावकर नाव ऐकलं आहे का? भारतातील दिग्गज अब्जाधीशांना देते टक्कर, मामा मुकेश अंबानी यांची आहे लाडकी
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 9:38 AM

नवी दिल्ली : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना दोन बहिणी आहेत. दीप्ती साळगावकर आणि नीना कोठारी. त्यांचे भाऊ अनिल अंबानी यांना सगळेच ओळखतात. तेही उद्योजक आहेत. पण दोन बहिणींविषयी कोणाला जास्त माहिती नाही. दीप्ती साळगावकर या कुटुंबातील सर्वात धाकट्या आहेत. त्यांनी राज साळगावकर यांच्यासोबत प्रेम विवाह केला. त्यांना विक्रम आणि इशिता साळगावकर (Ishita Salgaonkar) ही मुले आहेत. रिलायन्स समूहाचे अध्यक्ष (Reliance Industries Limited) मुकेश अंबानी यांची इशिता ही भाची आहे. इशिता एक आघाडीची व्यावसायिक आणि उद्योजक आहे. त्या अनेक बिझिनेस व्हेंचर्समध्ये सहभागी आहेत. पण एवढीच त्यांची ओळख नाही. अनेक सामाजिकी कार्यातही इशिता यांनी हिरारीने सहभाग घेतला आहे. इशिता यांची एकूण संपत्ती अब्जावधी (Net Worth) रुपयांची आहे. एक आलिशान जीवन जगत असतानाच आजही अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग आहे.

मुकेश अंबानी यांची ही भाची पुन्हा एकदा बोहल्यावर चढली. इशिता साळगावकर हिने दुसऱ्यांदा लग्न केले. अतुल्य मित्तल (Atulya Mittal) याच्यासोबत इशिताने पुन्हा संसाराची स्वप्न फुलवली आहेत. या दोघांची छायाचित्रं इंटरनेटवर व्हायरल झाली होती. बिझिनेस टायकून लक्ष्मी निवास मित्तल यांचा अतुल्य हा भाचा आहे. अतुल्यने हॉर्वर्ड स्कूल ऑफ बिझिनेसमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. अतुल्यपूर्वी इशिताचे लग्न नीरव मोदीचा भाऊ नीशाल मोदीसोबत झाले होते. या दोघांनी 2016 मध्ये लग्नगाठ बांधली होती. पण काही दिवसांनी दोघांनी काडीमोड घेतला. त्यानंतर अतुल्यसोबत इशिताने 2022 मध्ये धुमधडाक्यात लग्न केले.

इशिता साळगावकर हॉर्वर्ड बिझनेस स्कूलची माजी विद्यार्थी आहे. ती व्ही एम साळगावकर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडची उपाध्यक्ष आहे. इशिताच्या नेटवर्थविषयी अनेकांना जाणून घ्यायचे आहे. पण त्याविषयीची खरी माहिती अजूनही समोर आलेली नाही. पण इशिता अब्जाधीश असून भारतातील अनेक दिग्गज अब्जाधीशांना ती उद्योगात आणि संपत्तीत टक्कर देत आहे.

हे सुद्धा वाचा

इशिताची आई आणि धीरुभाई अंबानी यांची मुलगी दीप्ती अंबानी यांनी मुंबईतील अपार्टमेंटमधीलच राज ऊर्फ दत्तराज साळगावकर यांच्याशी प्रेमविवाह केला होता. या दोघांच्या लग्नाची गोष्ट मोठी रोचक आहे. सध्या साळगावकर कुटुंब गोवेकर झाले आहेत. वासुदेव साळगावकर यांचा मुलगा दत्तराज साळगावकर अनिल अंबानी यांच्यापेक्षा वयाने दोन वर्षे मोठे आहेत. मुकेश अंबानी आणि त्याच्यांत घनिष्ठ मैत्री होती. त्यामुळे दोघांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. याच दरम्यान राज आणि दीप्ती यांच्यात मैत्री झाली. ही मैत्री पुढे प्रेमात बदलली. दीप्ती आणि राज यांचे लग्न 1983 मध्ये झाले होते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.