तुम्ही इन्कम टॅक्स भरला आहे की नाही ?

तुम्हाला देखील HR विभागाकडून कोणता मेल आला आहे का ? गुंतवणुकीचे पुरावे सादर केले नसतील तर काय करावे हे जाणून घ्या

तुम्ही इन्कम टॅक्स भरला आहे की नाही ?
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 3:55 PM

मुंबई : दरवर्षी तुमच्या पगारातून कर कापला जाऊ नये यासाठी आर्थिक वर्ष सुरू होण्याआधीच नोकरदारांना पूर्ण वर्षाचे प्लॅनिंग करून डीक्लेरेशन द्यावे लागते. म्हणजेच कशामध्ये गुंतवणूक करून कर वाचवाल याची माहिती द्यावी लागते. याप्रमाणे HR कराचे कॅलक्यूलेशन करून तुमच्या पगारातून कोणता कर कापला जाणार नाही याबद्दल नमूद करतो. हे सर्व डिसेंबरपर्यंत चालते. त्यानंतर जानेवारीमध्ये HR कडून डीक्लेरेशनचे पुरावे सादर करण्याचा मेल येतो. जर तुम्ही पुरावे सादर करू शकला नाहीत तर तुम्ही कशातही गुंतवणूक न केल्याचे सिद्ध होते आणि उर्वरित 3 महिन्याच्या पगारातून संपूर्ण वर्षाचा कर कापून घेतला जातो.

आता साहिलने वर्षाच्या सुरुवातीलाच दीड लाख रुपये गुंतवणूक करण्याचे सांगितले परंतु केली नाही.

आता साहिलसमोर तीन प्रश्न उभे आहेत पहिला प्रश्न ,की आता देखील साहिल कर कसा वाचवू शकतो ? कर कपात वाचवण्यासाठी साहिलने गुंतवणुकीची कमिटमेंट दिली आहे टी पूर्ण करावी लागेल. HR मध्ये कराचे पुरावे सादर करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी आहे. जर साहिलकडे दीड लाख रुपये असतील तर गुंतववून पुरावे सादर करू शकतो.

दूसरा प्रश्न, संपूर्ण वर्षात गुंतवणूक केली नसेल तर शेवटच्या तीन महिन्यात कुठे गुंतवणूक करू शकतो ? साहिल कर वाचवण्यासाठी आयकर कलम 80C आणि 80D अंतर्गत गुंतवणूक करू शकतो. यामध्ये 80C अंतर्गत 2 मुलांची शिक्षणाची फी, PF, नॅशनल सेव्हींग सर्टिफिकेट , सुकन्या समृद्धी योजना, PPF, जीवन विमा प्रीमियम, इक्विटी लिंक्ड सेव्हींग स्कीम, गृहकर्जाचा EMI मधील मूळ रकमेचा हिस्सा याचा समावेश आहे.

तर 80D अंतर्गत आरोग्य विमा पॉलिसीचे 25 हजार रुपये आणि आई-वाडिलांसाठी आरोग्य विमा खरेदीवर 25 हजारपर्यंतच्या प्रीमियमवर एकूण मिळून 50 हजार ची अतिरिक्त कर बचत करता येते. जर साहिलकडे दीड लाख रुपये गुंतवणूक करण्यासाठी नसतील तर संपूर्ण वर्षाचा कर शेवटच्या 3 महिन्यात कापला जाईल.

तिसरा प्रश्न म्हणजे हा कर कापून पगार हातात मिळाल्यास काय करावे? जर साहिलने गुंतवणुकीचे पुरावे सादर केले नाहीत तर त्याचा कर कापला जाईल. पण कर कपातीनंतर देखील साहिलने 31 मार्च 2023 पर्यंत गुंतवणूक पूर्ण केली तर ITR भरून टॅक्सचा रिफंड मिळू शकतो

चला या वर्षी तर कर वाचवता येईल. परंतु हे दर वर्षी होऊ नये यासाठी आर्थिक वर्षांच्या सुरुवातीलच टॅक्स प्लॅनिंग सुरू करावे. गुंतवणुकीसाठी वाट बघू नका. थोडी थोडी गुंतवणूक केली तरीही त्यातून चांगला परतावा मिळेल आणि गुंतवणुकीचं ओझं देखील राहणार नाही.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.