कर्जवाटपात HDFC बँकेनं SBIलाही मागे टाकलं! खासगी बँकांचा दबदबा वाढला

इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम अंतर्गत 25 जानेवारी 2021 पर्यंत HDFC बँकेनं 23 हजार 504 कोटी रुपयांचं कर्जवाटप केलं आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाने फक्त 18 हजार 700 कोटी रुपयांचं कर्जवाटप केलं आहे.

कर्जवाटपात HDFC बँकेनं SBIलाही मागे टाकलं! खासगी बँकांचा दबदबा वाढला
एसबीआय, एचडीएफसीसह या बँकांनी वाढविली मुदत
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 4:00 PM

मुंबई : कोरोना संकटानंतर आता अर्थकारण पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारने 3 लाख कोटीची इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम (ECLGS)ची घोषणा केली होती. या योजनेची घोषणा कोरोनातून उभारी येण्यासाठी केली होती. या योजनेद्वारे बँक MSME ना 25 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करुन देते आणि त्याची गॅरंटी सरकार देते. या कर्जवाटपात HDFC बँकेनं SBI ला मागे टाकलं आहे.(HDFC Bank also surpassed SBI Bank in loan disbursement)

इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम अंतर्गत 25 जानेवारी 2021 पर्यंत HDFC बँकेनं 23 हजार 504 कोटी रुपयांचं कर्जवाटप केलं आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडियाने फक्त 18 हजार 700 कोटी रुपयांचं कर्जवाटप केलं आहे. मार्केट शेअरनुसार HDFC ने 17 टक्के तर SBI एकूण कर्जाच्या 13.30 टक्के वाटप केलं आहे. याद्वारे हे स्पष्ट होतं की आता खासगी बँका छोट्या कंपन्यांना कर्जवाटप करत आहेत. आर्थिक सुधारणांच्या दृष्टीकोनातून ही चांगली बाब आहे.

मे 2020 मध्ये योजनेची घोषणा

सरकारने ECLGS योजनेची घोषणा 13 मे 2020 मध्ये 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेट अंतर्गत केली होती. ही योजना दोन टप्प्यात लागू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात फक्त छोट्या उद्योगांना कर्जवाटपाची परवानगी देण्यात आली होती. तर दुसऱ्या टप्प्यात मोठ्या कंपन्यांनाही या योजनेतून कर्जवाटप करण्यात आलं. ECLGS योजनेअंतर्गत कोणत्या बँकेनं किती कर्जवाटप केलं आहे, याचा सविस्तर रिपोर्ट टाईम्स ऑफ इंडियाने छापला आहे. त्यानुसार कर्जवाटपाच्या प्रक्रियेत HDFC सर्वात पुढे आहे.

कोणत्या बँकेननं किती कर्जवाटप केलं.

>> HDFC – 43 हजार 705 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर, पैकी 23 हजार 504 कोटी रुपये वाटप

>> SBI – 25 हजार 618 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर, पैकी 18 हजार 699 कोटी रुपये वाटप

>> ICICI – 14 हजार 763 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर, पैकी 12 हजार 982 कोटी रपये वाटप

>> Kotak Mahindra – 11 हजार 911 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर, पैकी 5 हजार 737 कोटी रुपये वाटप

>> PNB – 10 हजार 998 कोटी रुपयांचं कर्ज मंजूर, पैकी 10 हजार 104 कोटी रुपये वाटप

संबंधित बातम्या :

SBI ग्राहकांसाठी अलर्ट! आताच अपडेट करा ही माहिती नाहीतर ATM होईल बंद

SBI च्या ATM वर 8 सुविधा मिळतात मोफत; आता दिवसभरात ‘एवढे’ काढता येणार पैसे

HDFC Bank also surpassed SBI Bank in loan disbursement

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.