कोरोना काळात ऑनलाईन बँकिंगचे युजर्स सातत्याने वाढत आहेत. अनेकजण ऑनलाईन बँकिंगचा वापर करुन त्यांचा दैनंदिन व्यवहार करत आहेत. यामुळे सायबर क्राईमच्या गुन्ह्यात मात्र सातत्याने वाढ होत आहे.
HDFC Bank
ऑनलाईन बँकिंगसाठी मोबाईल अॅप्लिकेशन कसे डाउनलोड करावे याबाबत बँकेने ग्राहकांना काही सूचना केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून बँकेचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले होते. यानंतर बँकेने याबाबतची सूचना केली आहे.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांनी स्क्रीन शेअर पर्यायाने कधीही अॅप्लिकेशन डाउनलोड करू नये. अनेकदा फसवणूक करणाऱ्या व्यक्ती या ग्राहकांना स्क्रीन शेअर करण्याचा सल्ला देतात आणि यानंतर तुमची फसवणूक करतात. त्यामुळे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करतेवेळी स्क्रीन शेअर करु नये.
जर ग्राहकांनी स्क्रीन शेअर केली तर ते तुमच्या फोनचा अॅक्सेस घेतात. त्यानंतर तुमच्या फोनमधील वैयक्तिक माहिती तसेच ओटीपी जनरेट करुन तुमच्या खात्यात पैसे काढू शकता. यामुळे नेहमी योग्य ठिकाणाहून अॅप्लिकेशन डाऊनलोड करा.
त्यासोबत अज्ञात कंपन्यांकडून किंवा व्यक्तीकडून येणारे फोन, ईमेलवरुन येणाऱ्या लिंकद्वारे अॅप्लिकेशन डाऊनलोड करु नका. त्याऐवजी प्ले स्टोअरवर जाऊन अॅप्लिकेशन डाऊनलोड करावे.