नवी दिल्ली : एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड (HDFC BANK) विलिनीकरणाच्या चर्चेनंतर गुंतवणुकदारांत उत्साह संचारला होता. त्यामुळे शेअर बाजारातही सकारात्मक परिणाम नोंदवला गेला. मात्र, उत्साह अधिक काळ शेअर बाजारावर दिसून आला नाही. काही दिवसांतच शेअर मध्ये घसरणीचे सत्र सुरू झाले. गेल्या नऊ दिवसांत गुंतवणुकदारांना तब्बल 2.6 लाख कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागले. एचडीएफसीच्या शेअरमध्ये (HDFC SHARE) नऊ ते दहा टक्क्यांची घसरण नोंदविली गेली आहे.गेल्या महिन्यात चार एप्रिलला एचडीएफसीची मार्केट वॅल्यू (MARKET VALUE) 9,18,591 कोटी रुपये होती आणि गेल्या नऊ दिवसांत 1.67 लाख कोटी रुपयांच्या नुकसानीसह 7,51,421 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर एचडीएफसी लिमिटेडची मार्केट वॅल्यू 4,85,692 कोटी रुपये होती. त्यामध्ये घट होऊन 3,94,097 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मार्केट वॅल्यूमध्ये 91,595 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
एचडीएफसी बँक शेअरमध्ये आज (मंगळवार) सलग नवव्या दिवशी दोन टक्क्यांची घसरणीसह 1,362 रुपयांवर व्यवहार करत होता. मागील व्यवहार सत्रात बेंचमार्क सेन्सेक्समध्ये बँकेचा स्टॉकमध्ये अंदाजित नऊ टक्क्यांची घसरण झाली. एचडीएफसी बँक सोबत एचडीएफसी लिमिटेडचे शेअर सलग घसरणीसह व्यवहार करत आहे. सध्या शेअर 2161 रुपयांवर ट्रेंडिंग सुरू आहे.
देशातील आघाडीची गृहवित्त कंपनी एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण केले जाणार आहे. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्शियल कॉर्पोरशनच्या संचालक मंडळाने विलीनीकरणाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे नव्या फेरबदलामुळे ग्राहकांना देखील मोठा फायदा होणार आहे. विलीनीकरणामुळे एचडीएफसी बँकेत एचडीएफसीची भागीदारी 41 टक्के असणार आहे. दरम्यान, विलिनीकरणाच्या प्रस्तावाला रिझर्व्ह बँकेचा ग्रीन सिग्नल मिळणं आवश्यक ठरणार आहे.
विलीनीकरणाच्या बातमीनं दोन्ही कंपन्यांचे शेअर्समध्ये बंपर तेजी नोंदविली गेली होती. एका अहवालानुसार, एचडीएफसीचा पोर्टफोलिओ 6.23 लाख कोटींवर पोहोचला आहे. एचडीएफसी बँकेचा एकूण पोर्टफोलिओ 19.38 लाख कोटींचा आहे. विलिनीकरणाच्या निर्णयामुळे एचडीएफसी बँकेच्या संपत्ती गुणवत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे. असुरक्षित लोनचे प्रमाण घटण्याचा अंदाज निरीक्षकांनी वर्तविली आहे.
RBI report: जागतिक घडामोडींचा प्रतिकूल परिणाम, मात्र भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत – आरबीआय