1 तासात उपचारासाठी व्हा दाखल, दावा निकाली काढल्याने 3 तासांत रुग्णालयातून मिळेल डिस्चार्ज, आरोग्य विम्यात असा झाला मोठा बदल

Health Insurance Update : आरोग्य विमाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. त्यामुळे त्वरीत उपचार मिळण्यासाठीचा अजून एक अडथळा इतिहास जमा झाला आहे. तर बदललेल्या नियमांमुळे ग्राहकांना आरोग्य विम्याचे लाभ लवकर मिळतील.

1 तासात उपचारासाठी व्हा दाखल, दावा निकाली काढल्याने 3 तासांत रुग्णालयातून मिळेल डिस्चार्ज, आरोग्य विम्यात असा झाला मोठा बदल
आरोग्य विमा क्षेत्रात मोठे बदल
Follow us
| Updated on: May 30, 2024 | 4:30 PM

आरोग्य विमा क्षेत्रात मोठी घडामोड घडली आहे. हा बदल ग्राहकांच्या पथ्यावर पडला आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने ((IRDAI) विमा कंपन्यांना दणका दिला आहे. विमा कंपन्यांच्या मनमानीला हा मोठा झटका मानण्यात येत आहे. इरडाने आरोग्य विम्यासंदर्भात एक परिपत्रक काढले आहे. रुग्णालयात रुग्ण, त्याचे नातेवाईक कॅशलेस उपचाराची विनंती पाठवत असेल तर विम्या कंपन्यांनी अवघ्या एका तासात त्याला मंजुरी देण्याचे निर्देश त्यात देण्यात आले आहे. या नवीन बदलामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

3 तासांत विमा कंपन्या दावा काढतील निकाली

विमा नियंत्रक इरडाने एका झटक्यात अनेक बदल केले. हे परिपत्रक ग्राहकांसाठी वरदान ठरले आहे. दाव्यासंबंधीच्या एका नियमात मोठा बदल झाला आहे. आता रुग्णावरील उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देताना हॉस्पिटलकडून विमा कंपनीला याविषयीची माहिती देण्यात येईल. त्याच्या पुढील तीन तासांतच विमा कंपनीला दावा निकाली काढावा लागेल.

हे सुद्धा वाचा

ग्राहकाला मिळेल मोठा फायदा

  1. कॅशलेस उपचारासाठी केवळ 1 तासात विमा कंपनीला यासंबंधीच्या विनंतीला मंजुरी द्यावी लागेल. त्यामुळे रुग्णावर त्वरीत उपचाराला सुरुवात करता येईल. तर रुग्णाच्या नातेवाईकांना सुरुवातीच्या उपचारासाठी भलीमोठी रक्कम जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करावी लागणार नाही.
  2. तर उपचार झाल्यानंतर पुढील तीन तासांतच विमा कंपन्यांना दावा निकाली काढावा लागणार आहे. त्यामुळे रुग्णालयाकडून पैसा मिळविण्यासाठी रुग्ण आणि नातेवाईकांना दिला जाणारा ताप कमी होईल. तर रुग्ण लवकरात लवकर घरी जाऊ शकेल.

मागील सर्व परिपत्रकं इतिहासजमा

इरडाने एका फटक्यात रुग्णांच्या काही अडचणी दूर केल्या आहेत. यापूर्वीचे सर्व परिपत्रकं या मुख्य परिपत्रकाने इतिहासजमा केले आहे. यापूर्वीच्या एकूण 55 परिपत्रकांना आता काही अर्थ उरलेला नाही. या सर्वांचे एक सर्वसमावेशक मुख्य परिपत्रक इराडाने आता लागू केले आहे. ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी विमा कंपन्यांना बाध्य करण्यात येत आहे. त्यांच्या मनमानीला चांगलाच चाप बसला आहे.

लपवाछपवी बंद

विमा कंपन्यांना आता प्रत्येक ग्राहकांना त्याच्या विमा पॉलिसीची माहिती सविस्तरपणे द्यावी लागणार आहे. यामध्ये सोप्या पद्धतीने पॉलिसी, तिचे नाव, तिची श्रेणी, विमा रक्कम, विमा संरक्षणासंबंधीची विस्तृत माहिती, विमा संरक्षण नसलेल्या इतर गोष्टींची माहिती, प्रतिक्षा कालावधी यांची माहिती देणे बंधनकारक आहे.

तर तंत्रज्ञानाच्या अधिक सक्षमपणे वापर करण्याची वकिली करण्यात आली आहे. विमा कंपन्या ऑनबोर्ड सर्व माहिती भरुन घ्यावी. त्यासंबंधीची सर्व कागदपत्रे जमा करुन घ्यावी. पेपरलेस कामावर त्यांनी भर द्यावा, अशी अपेक्षा या परिपत्रकात व्यक्त करण्यात आली आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.