आरोग्य विमा क्षेत्रात मोठी घडामोड घडली आहे. हा बदल ग्राहकांच्या पथ्यावर पडला आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने ((IRDAI) विमा कंपन्यांना दणका दिला आहे. विमा कंपन्यांच्या मनमानीला हा मोठा झटका मानण्यात येत आहे. इरडाने आरोग्य विम्यासंदर्भात एक परिपत्रक काढले आहे. रुग्णालयात रुग्ण, त्याचे नातेवाईक कॅशलेस उपचाराची विनंती पाठवत असेल तर विम्या कंपन्यांनी अवघ्या एका तासात त्याला मंजुरी देण्याचे निर्देश त्यात देण्यात आले आहे. या नवीन बदलामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
3 तासांत विमा कंपन्या दावा काढतील निकाली
विमा नियंत्रक इरडाने एका झटक्यात अनेक बदल केले. हे परिपत्रक ग्राहकांसाठी वरदान ठरले आहे. दाव्यासंबंधीच्या एका नियमात मोठा बदल झाला आहे. आता रुग्णावरील उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देताना हॉस्पिटलकडून विमा कंपनीला याविषयीची माहिती देण्यात येईल. त्याच्या पुढील तीन तासांतच विमा कंपनीला दावा निकाली काढावा लागेल.
ग्राहकाला मिळेल मोठा फायदा
मागील सर्व परिपत्रकं इतिहासजमा
इरडाने एका फटक्यात रुग्णांच्या काही अडचणी दूर केल्या आहेत. यापूर्वीचे सर्व परिपत्रकं या मुख्य परिपत्रकाने इतिहासजमा केले आहे. यापूर्वीच्या एकूण 55 परिपत्रकांना आता काही अर्थ उरलेला नाही. या सर्वांचे एक सर्वसमावेशक मुख्य परिपत्रक इराडाने आता लागू केले आहे. ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी विमा कंपन्यांना बाध्य करण्यात येत आहे. त्यांच्या मनमानीला चांगलाच चाप बसला आहे.
लपवाछपवी बंद
विमा कंपन्यांना आता प्रत्येक ग्राहकांना त्याच्या विमा पॉलिसीची माहिती सविस्तरपणे द्यावी लागणार आहे. यामध्ये सोप्या पद्धतीने पॉलिसी, तिचे नाव, तिची श्रेणी, विमा रक्कम, विमा संरक्षणासंबंधीची विस्तृत माहिती, विमा संरक्षण नसलेल्या इतर गोष्टींची माहिती, प्रतिक्षा कालावधी यांची माहिती देणे बंधनकारक आहे.
तर तंत्रज्ञानाच्या अधिक सक्षमपणे वापर करण्याची वकिली करण्यात आली आहे. विमा कंपन्या ऑनबोर्ड सर्व माहिती भरुन घ्यावी. त्यासंबंधीची सर्व कागदपत्रे जमा करुन घ्यावी. पेपरलेस कामावर त्यांनी भर द्यावा, अशी अपेक्षा या परिपत्रकात व्यक्त करण्यात आली आहे.