Vegetable Rate : पावसानं वाढवलं टेन्शन, भाज्या कडाडल्या, गृहिणींचं बजेट कोलमडलं

common vegetables cost news : उशीरा आलेल्या पावसाने एकदम दणका दिला. त्यानंतर पाणीच पाणी चहुकडे अशी स्थिती झाल्याने रोजाच्या जीवनावश्यक वस्तूवर त्याचा परिणाम झाला. भाजीपाल्याचे भाव कडाडले

Vegetable Rate : पावसानं वाढवलं टेन्शन, भाज्या कडाडल्या, गृहिणींचं बजेट कोलमडलं
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 1:46 PM

vegetables cost hike news : जून महिन्यात दडी मारुन बसलेल्या पावसाने (Rainy Season) या महिन्यात अचानक धक्कातंत्र दिले. गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुंबईकरांची अक्षरशः त्रेधात्रिपीट उडवली. तुंबापुरीत मुंबईकरांची (Mumbaikar) कोडी झाली. रस्तावरुन पाण्याचे पाट वाहत असल्याने रस्ते कोंडले, रेल्वे सेवा बाधीत झाली. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तुंच्या (essential products) पुरवठ्यावर सुद्धा झाला. भाजीपाल्याने (Vegetables Rates News) तर तोंडाची चवच घालवली. भाजीपाल्याच्या किंमतींनी गृहिणींना हैराण करुन सोडले आहे. एकतर पाण्यातून वाट काढत भाजी मार्केट (Vegetable Market) गाठायचे आणि किंमती ऐकून सर्द व्हायचे अशी वेळ मुंबईकरांवर आली आहे. भाज्यांनी तोंडचे पाणी पळवले आहे. आतापर्यंत उन्हाळ्यामुळे भाजीपाला महाग होता. आता पाऊस उशीरा झाल्याने भाज्यांच्या दरात चढ उतार झाले. आता भर पावसाळ्यात भाज्यांचे दरांनी घाम फोडला आहे आणि किचनचे बजेट (kitchen Budget) कोलमडले आहे. त्यामुळे रोजच्या जेवणातून भाज्यांचे सत्र कमी झाले आहे आणि दाळींवर गृहिणींनी भर वाढवला आहे. भाजीपाल्याची आवक वाढल्यानंतर भाज्यांचे दर पुन्हा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भाजी पूर्वीचे दर (रुपये प्रतिकिलो)आताचे दर (रुपये प्रतिकिलो)
टोमॅटो3070
वटाणा 120240
तोंडली60160
भेंडी60120
कोबी 80120
कोथिंबीर20 रुपये जुडी60 रुपये जुडी
काय आहेत कारणे

एपीएमसी मार्केटमध्येही(APMC Market) मोठ्या प्रमाणावर भाजीपाला (Vegetables) पडून असून तो खराबही झाला आहे. पावसामुळे वाहतुकीस अडथळा येत आहे. परिणामी भाज्यांची आवक कमी झाली आहे. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. भाजीपाल्याचे नगदी पीक खराब झाले आहे. या संकटांमुळे भाजीपाल्याच्या दरांनी कहर केला आहे. टोमॅटोचा दर 30 रुपयांहून थेट 70 रुपयांवर गेले आहेत तर कोबीचे दर 80 रुपयांहून थेट 120 रुपयांवर गेले आहेत. पनीर, मटर भाजीचा खमंग बेत आखात असाल तर थांबा. कारण या पनीर एकवेळेस तुमच्या जीभेला चव देईल पण इतर भाज्या ही चव घालवतील. वाटाण्याचे दर 120 रुपये किलोहून थेट 240 रुपये किलोवर गेले आहेत. या काही भाज्यांच्या किंमती दुप्पट झाल्या आहेत. एकीकडे घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेलसह सीएनजीपासून ते दुधापर्यंत सर्वाचेच दर प्रचंड वाढले आहेत त्यामुळे जगायचे कसे, खायचे काय असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर आहे.

हे सुद्धा वाचा

आवक कमी, पावसाचा परिणाम

यंदा फेब्रुवारी, एप्रिलमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता जो भाजीपाला हाती आला होता तो शेतक-यांनी बाजारात पाठवला खरा.परंतु, आता मुसळधार पावसाने संपूर्ण राज्यात थैमान घातले. वाहतुकीत प्रचंड अडथळा आल्याने बाजारात पोहोचलेला माल किरकोळ बाजारात पोहोचवताना अडचण वाढली. ग्रामीण भागातील पूल पुराच्या पाण्याखाली गेल्याने माल शेतातच पडून आहे. तो घाऊक बाजारात पोहचला नाही. परिणामी किरकोळ बाजारात भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.