Hindenburg Effect : साडेसाती संपेना! आठवड्यातच 9 लाख कोटींचा खड्डा, अदानी समूहाची पडझड थांबणार तरी कधी?

Hindenburg Effect : हिंडनबर्गाच्या तोफगोळ्यानंतर अदानी समूहाच्या पोटात गोळा आला आहे. त्यांच्या शेअरमधील पडझड पाहून गुंतवणूकदारांच्या पोटात गोळा उठला आहे, मग आता ही पडझड थांबणार तरी कधी?

Hindenburg Effect : साडेसाती संपेना! आठवड्यातच 9 लाख कोटींचा खड्डा, अदानी समूहाची पडझड थांबणार तरी कधी?
कधी संपणार साडेसाती
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 9:29 AM

नवी दिल्ली : चिंताग्रस्त गौतम अदानी (Gautam Adani) आणि अदानी समूहाला (Adani Group) हादरे याच बातम्या गेल्या आठवड्याभरापासून चवीने चर्चिल्या जात आहे. गेल्या आठवडाभरापासून तुमच्या मोबाईल स्क्रीनवर, टीव्हीवर, लॅपटॉप, डेस्कटॉपच्या स्क्रीनवर याच बातम्यांचा भडिमार सुरु आहे. कोणी याला आंतरराष्ट्रीय षडयंत्र म्हणतंय, कोणी त्याला राष्ट्रवादाच्या चष्म्यातून पाहत आहे. पण गुंतवणूकदार (Investors) आणि दस्तूरखूद्द अदानीला मात्र होणाऱ्या नुकसानीची चिंता आहे. ज्या वेगाने अदानी समूहाचे शेअर घसरत आहे. त्यावरुन लवकरच अदानी समूहाला मास्टर स्ट्रोक दिल्याशिवाय पडझड थांबविता येणार नाही. अदानी समूहाने नैतिकता जपत एफीओ रद्द केला. पण बाजारातील (Share Market) भयकंपावर त्यांना अद्यापही उपाय सापडलेला नाही. गेल्या दहा दिवसांपासून अदानी समूह पण या वादळात अडकला आहे.

अमेरिकन संशोधन संस्था हिंडनबर्गच्या अहवालानंतर शेअर बाजारात त्सुनामी आली. अदानी समूहावर संकट कोसळले. अदानी समूहाच्या शेअरमधील घसरण थांबलेली नाही. यामुळे समूहाचे बाजारी भांडवल (M-Cap) सातत्याने घसरणीला लागले आहे. गेल्या सात दिवसांच्या व्यापारी सत्रात अदानी समूहाला 9 लाख कोटी रुपयांचा फटका बसला.

24 जानेवारी 2023 रोजी हिंडनबर्गचा अहवाल सार्वजनिक झाला. या अहवालात अदानी समूहावर फसवणूकीचे आणि अनियमिततेचे आरोप करण्यात आले. त्यानंतर अदानी समूहासह बाजारात भूकंप आला. केंद्र सरकावर अदानी समूहाला पाठिशी घालण्याचा विरोधकांनी आरोप केला.

हे सुद्धा वाचा

या सर्व घडामोडीत अदानी समूहाला जोरदार हादरे बसले. गुंतवणूकदारांचा या समूहावरील विश्वास डळमळीत झाला. 24 जानेवारी 2023 रोजी अदानी समूहाचे बाजारातील भांडवल 19.2 लाख कोटी रुपये होते. गेल्या दहा दिवसांत ते 10 लाख कोटींनी कमी झाले. यावरुन किती तगडा फटका बसला हे दिसून येते.

अदानी पॉवर (22.5%) , अदानी टोटल गॅस (51%), अदानी विल्मर(23%), अदानी ग्रीन(40%) , अदानी ट्रांसमिशन (37%), अदानी पोर्ट्स(35%), अदानी इंटरप्राईजेस(38%), अंबुजा सिमेंट्स(33%), एसीसी आणि (21%) एनडीटीव्ही (17%) मिळून अदानी समूहाच्या एकूण 10 शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. हिंडनबर्गच्या अहवालानंतर या शेअरमध्ये 50 टक्क्यांची घसरण दिसून आली.

बिझनेस टुडेमध्ये याविषयीचे एक वृत्त प्रकाशित झाले. त्यानुसार, ग्रीन पोर्टफोलियाचे रिसर्च हेड अनुज जैन यांचे मत जाणून घेण्यात आले. त्यांनी सांगितले की, अदानी समूहाने नेहमीच अधिक मूल्यांकन केले आहे. अदानी समूहाच्या कृतीवर सातत्याने संशयही घेण्यात आला.

जैन यांच्या मते, अदानी इंटरप्राईजेस, अदानी ट्रांसमिशन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटल गॅस या शेअरमध्ये सातत्याने घसरण होऊनही त्यांचा व्यापार 3 डिजिटच्या PE वर सुरु आहे. अदानी समूह सातत्याने अधिक मूल्यांकन करत असल्याचा आरोप होत आहे.

काही तज्ज्ञांच्या मते, स्वतः अदानी समूहाला याविषयीचे मुद्देसूद्द स्पष्टीकरण द्यावे लागेल. व्यवस्थापनातील अस्पष्टता आणि हिंडनबर्ग अहवालातील आरोपाच्या दृष्टीने त्यांनी धोरण निश्चित केल्यास या वादळातून हा समूह बाहेर येऊ शकतो. भावनिक मुद्यावर लक्ष आकर्षित करता येऊ शकते. पण गुंतवणूकदार सजग असल्याने तो या जाळ्यात फसू शकत नाही.

Non Stop LIVE Update
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....