Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम अदाणीनंतर हिंडनबर्गच्या जाळ्यात मोठा मासा, एका बातमीनं 80 हजार कोटींचं नुकसान

अदानी ग्रुपला टार्गेट केल्यानंतर Hindenburg रिसर्चने आता ट्विटरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ जॅक डोर्सी यांच्या कंपनीवर आरोप केला आहे .

गौतम अदाणीनंतर हिंडनबर्गच्या जाळ्यात मोठा मासा, एका बातमीनं 80 हजार कोटींचं नुकसान
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 11:11 PM

मुंबई : अदानी ग्रुपला टार्गेट केल्यानंतर Hindenburg रिसर्चने आता ट्विटरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ जॅक डोर्सी यांची पेमेंट कंपनी Block Inc.ला लक्ष्य केले असून त्यांच्यावर फसवणुकीचा आरोप आहे. तर जॅक डोर्सी नक्की कोण आहेत आणि पेमेंट कंपनी ब्लॉक काय आहे?  या दोन्ही प्रश्नांची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात.

मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी ट्विटर सोडल्यानंतर ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी BlueSky हे नवीन प्लॅटफॉर्म लॉन्च केले. जॅक डोर्सी हे 2015 ते 2021 पर्यंत ट्विटरचे सह-संस्थापक होते. 2006 मध्ये, जॅक डोर्सी यांनी ईवान विल्यम्सशी हातमिळवणी केली आणि वापरकर्त्यांसाठी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Twitter लाँच केले होते.

जॅक डोर्सी यांनी ट्विटर कधी सोडले? हा प्रश्न तुमच्याही मनात नक्कीच निर्माण होत असेल. तर याबाबतही आपण जाणून घेऊया. नोव्हेंबर 2021 मध्ये जॅक डोर्सी यांनी ट्विटरचा राजीनामा दिला होता.

कोण आहेत जॅक डोर्सी?

जॅक डोर्सी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1976 रोजी सेंट लुईस, यूएसए येथे झाला. त्यांनी डु बौर्ग हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. जॅक डोर्सींना लहानपणापासूनच संगणकाची आवड होती. माध्यमांच्या वृत्तानुसार, हायस्कूलनंतर, त्यांनी मिसौरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, परंतु त्यांनी शिक्षण पूर्ण न करता अर्ध्यातूनच कॉलेज सोडले. त्यांच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्यांनी सुरुवातीला प्रोग्रामर म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

ब्लॉकबद्दल जाणून घ्या महत्त्वाची माहिती ब्लॉक पूर्वी स्क्वेअर म्हणूनही ओळखला जात असे. हिंडेनबर्गच्या अहवालात असे म्हटले आहे की कंपनीच्या Block ॲपमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी समोर आल्या आहेत, ज्या लपवण्याचा कंपनी प्रयत्न करत आहे.

कोरोना काळात Block Inc. या प्लॅटफॉर्ममध्ये तेजी दिसली आहे, कारण या अॅपद्वारे 5.1 कोटींहून अधिक व्यवहार केले जातात. आता तुम्ही विचार करत असाल की हे अॅप कसे कमावते, तर  हे ॲप इंटरचेंज फीद्वारे 35 टक्के कमाई करते.

ब्लूस्काय आहे तरी काय?

मार्च 2023 च्या सुरुवातीस, जॅक डोर्सी यांनी Blue Sky लाँच केला, जो वापरकर्त्यांसाठी Twitter शी स्पर्धा करण्यासाठी एक नवीन अनुप्रयोग आहे.  या ॲपबद्दल सांगायचं झालं तर, यूजर्स ट्विटरप्रमाणेच या ॲपवर इतरांना फॉलो करू शकतात, ट्विट करू शकतात.  हे ॲप ॲपल ॲप स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र सध्या हे ॲप टेस्टिंगच्या टप्प्यात आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.