Hindenburg New Target : हिंडनबर्गची चौथी शिकार, कंपनी बर्बाद! 80 टक्के शेअर धराशायी एकाच दिवसात

Hindenburg New Target : हिंडनबर्ग रिसर्चच्या एका दणक्याने ही मोबाईल पेमेंट ॲप कंपनी धराशायी झाली. या कंपनीचे एकाच दिवसात 80 टक्के शेअर स्वाहा झाले. कोण आहे नवीन गौतम अदानी

Hindenburg New Target : हिंडनबर्गची चौथी शिकार, कंपनी बर्बाद! 80 टक्के शेअर धराशायी एकाच दिवसात
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 4:19 PM

नवी दिल्ली : अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडनबर्गने (Hindenburg Research) या वर्षातील चौथी शिकार अखेर केलीच. हिंडनबर्ग रिसर्चने मंगळवारी टिंगो ग्रुपच्या कथित घोटाळ्याची माहिती जगासमोर आणली. हिंडनबर्ग रिसर्चच्या एका दणक्याने ही मोबाईल पेमेंट ॲप कंपनी धराशायी झाली. या खुलाशानंतर एकच खळबळ उडाली. अवघ्या 20 तासांतच हा रिपोर्ट व्हायरल झाला. त्यामुळे टिंगो ग्रुपचे शेअर (Share Falls) गडगडले. या कंपनीत भूंकप झाला. या कंपनीचे एकाच दिवसात 80 टक्के शेअर स्वाहा झाले. कोणत्या देशाची आहे ही कंपनी आणि तिच्या मालकला याचा कसा फटका बसला? कोण आहेत हे नवीन गौतम अदानी..

अशी असते स्ट्रॅटर्जी हिंडनबर्ग रिसर्च ज्यावेळी कोणत्याही कंपनीसंबंधी खुलासा करते, त्यावेळी कंपनी एकावेळी अनेक ट्विट करते. यामध्ये कंपनीच्या गडबडी, घोटाळे ती समोर आणते. यावेळी हिंडनबर्गने Tingo ग्रुपचे संस्थापक डोजी मोंबोसी (Dozy Mmobuosi) यांना टार्गेट केले आहे. त्यांनी मोंबोसी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. हिंडनबर्गने टिंगो समूहाच्या आर्थिक स्थितीवरच सवाल उठवत हा सगळा प्रकार एका मोठ्या घोटाळ्याचा भाग असल्याचे सांगितले.

टिंगोची तब्येत बिघडली हिंडनबर्गचा बॉम्ब पडताच, Tingo Group च्या पायाखालची जमीन सरकली. या ग्रुपचे शेअर 80 टक्क्यांहून गडगडले. सध्या हा शेअर 80.73 टक्क्यांहून घसरुण 0.064 डॉलरवर आपटला. यावर्षाच्या सुरुवातीला या शेअरची आणि कंपनीची जगभर चर्चा होती. या कंपनीने सॉकर टीम, शेफील्ड युनायटेड खरेदीचा प्रयत्न केला होता.

हे सुद्धा वाचा

काय करते Tingo टिंगो ही एक ॲग्री फिनटेक कंपनी आहे. डोजी मोंबोसी हे या कंपनीचे संस्थापक आहे. या कंपनीवर हिंडनबर्गने अनेक गंभीर आरोप लावले आहेत. टिंगो समूह अफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया आणि मध्यपूर्व देशांमध्ये कारभार पाहतो. नायजेरियातील शेती आणि शेतीपुरक व्यवसायात हा समूह कार्यरत आहे. मोबाईल टेक्नॉलॉजी आणि पेमेंट बिझनेसमध्ये पण या समूहाने हातपाय पसरवले आहेत.

असा टाकला बॉम्ब हिंडनबर्ग रिसर्चनुसार, डोजी मोंबोसी यांनी नायजेरियाचे पहिले पेमेंट ॲप तयार करण्याचा केलेला दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. हे ॲप तयार करणाऱ्यांशी हिंडनबर्गने संपर्क केला असता, मोंबोसी यांचा दावा त्यांनी फेटाळून लावला. मोंबोसी यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे त्यांनी सांगितले. हँडसेट लिजिंग, कॉलिंग आणि डेटा यामाध्यमातून या कंपनीने गेल्या वर्षी 128 दशलक्ष डॉलरचा महसूल गोळा केल्याचा दावा करण्यात येत आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.