Gautam Adani : हिंडनबर्गचे वादळ, पर्याय पण खुंटले, अदानी समूहाने घेतला आता हा मोठा निर्णय

Gautam Adani : हिंडनबर्ग वादळाचे पडसाद आणि परिणाम अजून ही थांबलेले नाही. एक महिन्यापूर्वी आलेल्या या वादळातून अदानी समूहाची सूटका झालेली नाही. आता अदानी समूहाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

Gautam Adani : हिंडनबर्गचे वादळ, पर्याय पण खुंटले, अदानी समूहाने घेतला आता हा मोठा निर्णय
अदानी समूह झाला सक्रीय
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 10:12 AM

नवी दिल्ली : अमेरिकन संशोधन संस्था आणि शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्गच्या अहवालानंतर (Hindenburg Report) अदानी समूहाला झटका बसला. या समूहाला पहिल्यांदाच अशा वादळाने तडाखा दिला. त्याचा परिणाम शेअर बाजारावरही झाला. आता सेबी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने अदानी समूहाच्या (Adani Group) अडचणी वाढवल्या आहे. हा आठवडा अदानी समूहासाठी लकी ठरला. समूहातील काही कंपन्यांचे शेअर सातत्याने तेजीत होते. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हिंडनबर्ग रिपोर्टच्या अनुषंगाने चौकशीसाठी सहा सदस्यीय समिती गठित केली. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी समूहाने पर्याय शोधला आहे. चार कंपन्यांमधील हिस्सेदारी American Asset Manager कंपनी जीक्यूजी पार्टनर्स (GQG Partners) यांना 15,446 कोटी रुपयांना विक्री केली आहे.

अदानी समूहाला येत्या महिन्यात 2 अब्ज डॉलरपेक्षा अधिकचे कर्ज चुकते करायचे आहे. त्यासाठी त्यांना मोठ्या रक्कमेची आवश्यकता आहे. समूह कर्ज चुकविण्यासाठी कंपन्यांमधील हिस्सा तर विकणारच आहे. पण ऑस्ट्रेलियातील कोळसा खाणीवर कर्ज मिळण्यासाठी चाचपणी करणार आहे. मोठ्या रक्कमेची जुळवाजुळव करण्यासाठी कंपनी सध्या पर्याय शोधत आहे. सध्या शेअर बाजारातील सूचीबद्ध असलेल्या चार कंपन्यांमधील काही हिस्सा विक्री करण्यात आला आहे.

अदानी समूहाने, अदानी पोर्ट्स ॲंड स्पेशल इकोनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ), अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL), अदानी ट्रांसमिशन लिमिटेड (ATL) आणि अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड (AEL) या सूचीबद्ध कंपन्यांतील शेअर बाजारात विक्री केले. जीक्यूजी पार्टनर्स या अमेरिकन कंपनीने हा सौदा केला आहे. ही कंपनी अदानी समूहातील गुंतवणूकदार झाली आहे.

हे सुद्धा वाचा

अदानी समूहावर 2.21 लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. यामधील जवळपास 8 टक्के कर्ज पुढील आर्थिक वर्ष संपेपर्यंत चुकते करायचे आहे. विक्रीपूर्वी एईएलमध्ये प्रवर्तकांचा 72.6 टक्के हिस्सा होता. यातील 3.8 कोटी शेअर्स किंवा 3.39 टक्के भागभांडवल 5,460 कोटी रुपयांना विक्री झाले. APSE मध्ये प्रवर्तकांचा 66 टक्के हिस्सा होता आणि त्यांनी 8.8 कोटी समभाग अथवा 4.1 टक्के भागभांडवल 5,282 कोटी रुपयांना विकले.

एटीएल कंपनीमध्ये प्रवर्तकांचा वाटा 73.9 टक्के होता. या कंपनीचे 2.8 कोटी शेअर वा 2.5 टक्के हिस्सा 1,898 कोटी रुपयांना विक्री करण्यात आला. एजीईएल कंपनीत प्रवतर्कांकडे 60.5 टक्के हिस्सा होता. या कंपनीतील 5.5 कोटी शेअर अथवा 3.5 टक्के हिस्सेदारी 2,806 कोटी रुपयांना विक्री करण्यात आला. अदानी समूहातील हा विक्री करार सध्या चर्चेत आहे. एवढ वादळ आलं तरी परदेशी गुंतवणूकदारांचा अदानी समूहावर विश्वास असल्याचे या सौद्यातून अधोरेखित होत असल्याचा दावा कंपनीचे सीएफओ जुगशिंदर सिंह (रॉबी) यांनी केला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.