Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share : गुंतवणूकदार झाले मालामाल, या सरकारी कंपनीने दिला तगडा रिटर्न, वर्षाच्या आतच पैसा झाला दुप्पट..

Share : या सरकारी कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे..

Share : गुंतवणूकदार झाले मालामाल, या सरकारी कंपनीने दिला तगडा रिटर्न, वर्षाच्या आतच पैसा झाला दुप्पट..
सरकारी कंपनीची कमालImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 16, 2022 | 10:06 PM

नवी दिल्ली : एअरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील या सरकारी कंपनीने (Government Company) गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ही ती कंपनी आहे. या कंपनीने वर्ष पूर्ण होण्याअगोदरच आतापर्यंत 118 टक्क्यांपर्यंतचा रिटर्न (Return) दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार (Investors) अवघ्या दहा महिन्यांतच मालामाल केले आहे.

Hindustan Aeronautics Limited चा शेअर बुधवारी, 16 नोव्हेंबर रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये(BSE) 6 टक्क्यांनी वधरला आणि 2682.15 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअरमध्ये 52 आठवड्यांत 2709 रुपयांचा उच्चांकी झेप घेतली आहे.

HAL चा शेअर या वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2022 रोजी 1233.60 रुपयांच्या स्तरावर होता. तर बुधवारी, 16 नोव्हेंबर रोजी हा शेअर 2682.15 रुपयांवर बंद झाला. एकाच वर्षात या कंपनीने जोरदार मुसंडी मारली आहे.

हे सुद्धा वाचा

जर एखाद्या व्यक्तीने दोन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते तर ही रक्कम काढली नसती तर ती गुंतवणूक 3.90 लाख रुपये झाली असती. गेल्या सहा महिन्यातच या कंपनीच्या शेअरमध्ये 61 टक्क्यांची वाढ झाली आहे.

तर एखाद्या व्यक्तीने या वर्षाच्या सुरुवातीला या कंपनीचे एक लाखांचे शेअर खरेदी केले असते तरीही त्याला जोरदार परतावा मिळाला असता. सध्याच्या स्थितीत या गुंतवणूकदाराला 2.17 लाख रुपयांचा फायदा झाला असता. केवळ दहा महिन्यांतच गुंतवणूकदारांना हा फायदा मिळाला असता.

या कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होऊ दिलेला नाही. या कंपनीचा शेअरमध्ये 52 आठवड्यांत 2709 रुपयांचा उच्चांकी झेप घेतली आहे. तर कंपनीचा 52 आठवड्यांतील नीच्चांकी कामगिरी 1181.25 रुपये आहे. ही सरकारी कंपनी असली तरी तिची कामगिरी जोरदार आहे.  त्याचा फायदा गुंतवणूकदारांना होत आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.