Share Market : शेअर बाजाराच्या ऐतिहासिक उडीने सरन्यायाधीश चिंतेत; SEBI चा घेतला क्लास, काय केली सूचना

Chief Justice Of India : या आठवड्यात शेअर बाजाराने ऐतिहासिक कामगिरी केली. एका मागून एक धडाधड विक्रम रचले. जगातील इतर बाजारावर घसरणीचे सावट असताना भारतीय शेअर बाजाराने ऐतिहासिक भरारी घेतली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी अशी चिंता व्यक्त केली.

Share Market : शेअर बाजाराच्या ऐतिहासिक उडीने सरन्यायाधीश चिंतेत; SEBI चा घेतला क्लास, काय केली सूचना
सरन्यायाधीशांनी बाजाराच्या तेजीवर व्यक्त केली चिंता
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 3:48 PM

देशातील घरगुती शेअर बाजार सध्या तेजीच्या हिंदोळ्यावर स्वार आहे. तो ऐतिहासिक उंच भरारीचा साक्षीदार झाला आहे. या आठवड्यात एका पाठोपाठ एक नवनवीन रेकॉर्ड शेअर बाजाराने नावावर नोंदवले आहे. एका महिन्यात सेन्सेक्सने 10 हजार अंकांची जबरदस्त उसळी घेतली आहे. या विक्रमी बुल रनमुळे गुंतवणूकदारांनी नोटा छापल्या आहेत. या बुल रन अर्थात सर्वांनाच खूष ठेवत नसल्याचे दिसून येते. काही लोक या कमाल घौडदौडीमुळे भयभीत झाले आहेत. बाजारातील अनेक तज्ज्ञांसाठी ही तेजी भीतीपेक्षा कमी नाही. त्यांनी याविषयी साशंकता पण व्यक्त केली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी पण शेअर बाजाराच्या या तडाखेबंद खेळीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सेबीसह इतर संस्थांना असा सल्ला दिला आहे.

बाजारातील तेजीवर सरन्यायाधीशांची चिंता

भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी शेअर बाजारातील रेकॉर्ड तेजीवर चिंता व्यक्त केली आहे. बीएसई सेन्सेक्स 80 हजारांच्या घौडदौडीचा उल्लेख करत आता सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. खासकरुन या तेजीत बाजार नियामक सेबी आणि सिक्युरिटीज ॲपिलेट ट्रिब्युनलने अधिक सतर्क राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

सेबी आणि सॅटवर अधिक जबाबदारी

सरन्यायाधीश म्हणाले जस-जशी शेअर बाजारात तेजी वाढत आहे. मला वाटते सेबी आणि सॅटवरील जबाबदारी वाढणार आहे. माझ्या मते, अशा परिस्थितीत सेबी आणि सॅट सावधगिरी बाळगतील. ते बाजाराच्या यशाचा जल्लोष करतील, पण ते बाजार अधिक मजबूत होईल, याकडे पण लक्ष देतील. देशात स्थिर आणि अंदाज लावण्यायोग्य गुंतवणुकीची परिस्थिती तयार करण्याची मोठी जबाबदारी सेबी आणि सॅटवर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या आठवड्यात सेन्सेक्स 80 हजार अंकाच्या पुढे

सरन्यायाधीशांची टिप्पणी अशावेळी आली, ज्यावेळी बीएसई सेन्सेक्सने ऐतिहासिक 80 हजार अंकांचा टप्पा पार केला. केवळ सरन्यायाधीशच नाही तर इतर अर्थतज्ज्ञांनी पण या तुफान तेजीवर चिंता व्यक्त केली आहे. F&O सेगमेंटमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढलेल्या गुंतवणुकीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पण चिंता व्यक्त केली आहे. तर सेबी प्रमुख माधवी पुरी-बुच यांनी पण काही दिवसांपूर्वी मिड आणि स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये बुडबुड्याची आशंका व्यक्त केली होती.

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.