लंडनमध्ये गोऱ्या साहेबांपेक्षा भारतीयांकडे अधिक मालमत्ता, दाव्याने जगात खळबळ

| Updated on: Nov 10, 2023 | 3:01 PM

London Property Market | काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका दाव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. हा दावा भारतीयसंबंधी आहे. कधीकाळी ज्यांच्या सत्तेचा सूर्य कधीच मावळत नव्हता. त्या ब्रिटिशांच्या राजधानीत भारतीयांकडे सर्वाधिक मालमत्ता असल्याचा दावा यामध्ये करण्यात आला आहे. काय आहे या दाव्याची सत्यता...

लंडनमध्ये गोऱ्या साहेबांपेक्षा भारतीयांकडे अधिक मालमत्ता, दाव्याने जगात खळबळ
Image Credit source: फाईल फोटो
Follow us on

नवी दिल्ली | 10 नोव्हेंबर 2023 : सोशल मीडियावर दिवाळीच्या काळात एक दावा चर्चेत आला आहे. ब्रिटिश सत्तेचा सूर्य कधीच मावळत नसल्याचे पूर्वी सांगितले जायचे. त्यावर ब्रिटिशांना कोण गर्व होता. कारण त्यांची सत्ता अनेक देशात होती. पण या 70 वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. आता ब्रिटिशांची राजधानी असलेल्या लंडन शहरात गोऱ्या साहेबांपेक्षा भारतीयांकडे अधिक मालमत्ता असल्याचा दावा करण्यात येत आहे. लंडन ही इंग्लंडची राजधानी आहे. 1947 पर्यंत ब्रिटिशांनी भारतावर प्रदीर्घ राज्य केले. या घटनेकडे लोक रिव्हर्स कॉलोनियलिज्म या दृष्टीने पण पाहत आहे. पण या दाव्यात किती सत्यता आहे?

लंडनच्या रिअल इस्टेटमध्ये भारतीयांचा दबदबा

इंग्लंडच्या प्रमुख विकासकांपैकी एक Barratt London ने लंडन रिअल इस्टेटसंदर्भात जवळपास एक वर्षांपूर्वी एक अहवाल तयार केला. या अहवालातील आकडेमोड आता समोर आली आहे. या अहवालाने हा गौप्यस्फोट केला आहे. त्यानुसार, लंडन प्रॉपर्टी मार्केटमध्ये भारतीयांचे प्राबल्य वाढले आहे. Barratt London नुसार, रिअल इस्टेटमध्ये भारतीयांनी इंग्रजांना मात दिली आहे. मालमत्तांच्या मालकी बाबत इंग्रजापेक्षा भारतीय सर्वात पुढे आहे.

हे सुद्धा वाचा

तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानी

Barratt London मधील रिपोर्टनुसार, ब्रिटेशनची राजधानीत भारतीयांची सर्वाधिक मालमत्ता आहे. जे भारतीय लंडनमध्ये शिक्षणासाठी थांबले. त्यांनी तिथेच त्यांची नोकरी आणि आशियाना शोधला. ते तिथेच स्थायिक झाले. त्यांची तिसरी पिढी समोर आली आहे. तर इतर देशातील भारतीयांनी पण लंडनमध्ये घर खरेदी केले आहेत. काही भारतीय गुंतवणूकदारांनी लंडनचा पर्याय निवडला आहे. सर्वात शेवटी सध्या शिक्षणासाठी पोहचलेल्या भारतीय विद्यार्थ्यांपैकी काहींनी तिथे मालमत्ता भाडेतत्वावर घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकावर ब्रिटिश नागरिक आहेत. तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानी नागरिक आहेत.

दुसऱ्या अहवालात पण दुजोरा


रिअल इस्टेट फर्म सोथेबीजच्या अहवालाने पण या दाव्याला दुजोरा दिला आहे. त्याची पुष्टी केली आहे. 2022 मध्ये लंडनमध्ये प्रॉपर्टी खरेदीत भारतीयांनी आघाडी घेतल्याचे म्हटले आहे. Barratt London च्या दाव्यानुसार, भारतीय लंडनमध्ये घर खरेदीसाठी कोट्यवधी रुपये मोजत आहे. एक ते 3 बेडरुमच्या अपार्टमेंटसाठी भारतीय 3 ते 4.5 कोटी रुपये मोजत असल्याचा दावा करण्यात येत आहे.