Infosys Success Story : सत्ते पे सत्ता! 7 मित्रांनी 10 हजार रुपयांत रचला इतिहास, आज इतक्या लाख कोटींची उलाढाल

Infosys Success Story : जवळपास चार दशकांपूर्वी या यश कथेची पटकथा लिहण्यास सुरुवात झाली आणि पाहता पाहता आज ही कंपनी देशाची दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी झाली. या कंपनीची उलाढाल इतक्या लाख कोटी रुपयांची आहे.

Infosys Success Story : सत्ते पे सत्ता! 7 मित्रांनी 10 हजार रुपयांत रचला इतिहास, आज इतक्या लाख कोटींची उलाढाल
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 11:10 AM

नवी दिल्ली : जवळपास चार दशकांपूर्वी या यश कथेची पटकथा लिहण्यास सुरुवात झाली आणि पाहता पाहता आज ही कंपनी देशाची दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी झाली. 1981 मध्ये सात मित्रांनी मिळून इन्फोसिसची (Infosys Company) स्थापना केली होती. आज या कंपनीने इतिहास रचला आहे. पाटणी कंपनीतून या मित्रांच्या करिअरला सुरुवात झाली होती. टाटा समूहाच्या (Tata Group) कंपनी नंतर ही कंपनी भारताची दुसरी मोठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी (Second Largest IT Company) आहे. भारतातील बेशकिंमती कंपनीत इन्फोसिसचा समावेश होतो. या कंपनीकडे सध्या सव्वा तीन लाख कर्मचाऱ्यांची फौज आहे. ही कंपनी जगभर सेवा देते. या कंपनीची उलाढाल इतक्या लाख कोटी रुपयांची आहे.

तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण या कंपनीची सुरुवात त्याकाळी केवळ 10 हजार रुपयांत झाली होती. 1981 मध्ये 7 तरुण अभियंत्यांनी स्वतःच्या कंपनीचे स्वप्न पाहिले. ते स्वप्न ते जगले. त्यासाठी कष्ट घेतले आणि पुढे त्यांच्या यशाचे संपूर्ण जग साक्षीदार आहे. पाटणी कंम्प्युटर सिस्टममध्ये हे सात मित्र एकत्र काम करत होते. स्वप्नासाठी त्यांनी त्याकाळी नोकरीवर पाणी सोडले.

पाटणी कंम्प्युटर सिस्टमला राम राम ठोकल्यानंतर या सात मित्रांनी आयटी सेवा पुरवठादार म्हणून कामाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्याकडे 10 हजार रुपयांचा निधी होता. एन. आर. नारायण मूर्ती, नंदन नीलेकणी, एन. एस. राघवन, एस. गोपालकृष्णन, एस. डी. शिबूलाल, के. दिनेश आणि अशोक अरोरा यांनी या कंपनीची सुरुवात केली. आज या कंपनीचे बाजारातील भागभांडवल 1.32 लाख कोटी रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

मूर्ती यांच्या पत्नीने दिले पैसे

इन्फोसिसचे प्रमुख संस्थापक एन आर. नारायण मूर्ती यांची पत्नी सुधा मूर्ती यांनी या कंपनीसाठी पैसे उधार दिले होते. सुरुवातीला अत्यंत कमी भांडवल, कमी संसाधनं यांच्या मदतीने ही कंपनी सुरु करण्यात आली होती. हळूहळू या कंपनीने विस्तार केला आणि पुढे इतिहास रचला. पाटणी कंम्युटर पुढे आईगेट कॉर्पोरेशनने खरेदी केली. 2011 मध्ये केपजेमिनीने ही कंपनी खरेदी केली होती.

कोणताही मोठा अनुभव गाठीशी नसताना इन्फोसिसने अनेकांना पाणी पाजले. यशाची एक एक पायरी ही कंपनी चढली. 31 मार्च, 2022 रोजी या कंपनीचे बाजारातील भागभांडवल 16.3 अब्ज डॉलर, म्हणजे जवळपास 1.32 लाख कोटी रुपये होते. या कंपनीकडे एकूण 3.14 लाख कर्मचारी होते

अमेरिकन शेअर बाजारात प्रवेश

इन्फोसिसने गेल्या चार दशकात मोठी झेप घेतली. 1999 मध्ये ही कंपनी अमेरिकन स्टॉक एक्सचेंज, Nasdaq वर सूचीबद्ध, लिस्टेड झाली. अशा प्रकारचा इतिहास रचणारी ही पहिली भारतीय कंपनी ठरली. गेल्या वर्षी जुलैमध्ये इन्फोसिसने कमाल केली. 100 अब्ज डॉलरपेक्षा अधिक बाजार मूल्य असलेली ही दुसरी भारतीय आयटी कंपनी ठरली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.