घर खरेदी करणाऱ्यांना आता अनुदानासाठी वाट पाहावी लागणार नाही!
मुंबई : घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजनेअंतर्गत घर खरेदी केल्यावर मिळणाऱ्या अनुदानासाठी वाट पाहावी लागणार नाही. सरकारने घर खरेदी करणाऱ्यांच्या क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजनेची गती वाढण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने सर्व व्यावसायिक बँका आणि एनएचबी अनुदानाच्या रकमेची भरपाई लवकरात लवकर करण्यास सांगितले. सध्या घर खरेदी करणाऱ्यांना ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत […]
मुंबई : घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजनेअंतर्गत घर खरेदी केल्यावर मिळणाऱ्या अनुदानासाठी वाट पाहावी लागणार नाही. सरकारने घर खरेदी करणाऱ्यांच्या क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजनेची गती वाढण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने सर्व व्यावसायिक बँका आणि एनएचबी अनुदानाच्या रकमेची भरपाई लवकरात लवकर करण्यास सांगितले.
सध्या घर खरेदी करणाऱ्यांना ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानासाठी तीन-चार महिने वाट बघावी लागते. जोपर्यंत सरकारकडून अनुदानाचे पैसे येत नाही तोपर्यंत घराच्या संपूर्ण खर्चावर ईएमआय भरावा लागतो. अनुदानाचे पैसे आल्यावर ईएमआयही कमी होतो.
सरकारी बँकाना घर खरेदी करणाऱ्यांची माहिती मिळताच त्वरित अनुदान देण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. याअंतर्गत क्रेडिट लिंक्ड सबसिडीसाठी एनएचबीला सात हजार कोटी रुपये मिळणार आहेत, अशी माहिती आहे. क्रेडिट लिंक्ड सब्सिडी अंतर्गत घर खरेदी करणाऱ्यांना चार विभागांमध्ये व्याजात सवलत मिळते. नगर विकास मंत्रालयाने मार्चच्या अखेरीपर्यंत 5.5 लाख घरं मंजूर करण्याची योजना आखली आहे.
या अनुदानाचा फायदा ईडब्ल्यूएस, एलआयजी, एमआयजी -1 आणि एमआयजी -2 या चार विभागांत मिळतो. या योजनेअंतर्गत आजवर 1.40 लाख कुटुंबांना या अनुदानाचा फायदा झाला आहे.