HOME LOAN : होम लोन महागणार, एचडीएफसीच्या लेडिंग रेटमध्ये बदल; जुन्या ग्राहकांना भुर्दंड
एचडीएफसीच्या केवळ जुन्या ग्राहकांसाठी सुधारित बदल लागू असणार आहे. रिझर्व्ह बँकेने (Reserve bank of India) व्याज दरात जैसे थे धोरण स्विकारल्यामुळे वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये लेंडिग रेट वाढीची चर्चा सरू होती. त्यामुळे एचडीएफसीने दीर्घकाळानंतर लेडिंग रेटमध्ये 5 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे.
नवी दिल्ली : गृहवित्त पुरवठा करणाऱ्या अग्रणी एचडीएफसी बँकेचे गृहकर्ज महागण्याची शक्यता आहे. एचडीएफसीने आरपीएलआरमध्ये (रिटेल प्राईम लेडिंर रेट) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गृहकर्जाच्या दरात 5 बेसिस पॉईंटची (Basis point) वाढ नोंदविली गेली आहे. दरम्यान, नव्या ग्राहकांवर बदल लागू नसणार नाही. एचडीएफसीच्या केवळ जुन्या ग्राहकांसाठी सुधारित बदल लागू असणार आहे. रिझर्व्ह बँकेने (Reserve bank of India) व्याज दरात जैसे थे धोरण स्विकारल्यामुळे वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये लेंडिग रेट वाढीची चर्चा सरू होती. त्यामुळे एचडीएफसीने दीर्घकाळानंतर लेडिंग रेटमध्ये 5 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. एचडीएफसी नंतर अन्य बँकाही प्राईम लेंडिंग रेट (Prime lending rate) मध्ये वाढ करण्याची शक्यता नाकारता येत नाही. नव्या घराचं स्वप्न साकार करू पाहणाऱ्या ग्राहकांना गृहकर्जासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
महिन्यानंतर पुन्हा वाढ
एचडीएफसीने गेल्या महिन्यात प्राईम लेंडिंग रेटमध्ये वाढीची घोषणा केली होती. त्यावेळी 20 बेसिस पॉईंटपर्यंत वाढ करण्यात आली होती. नवीन दराची अंमलबजावणी एक एप्रिलपासून केली जाणार आहे. या निर्णयानंतर एक महिन्यांनीच एचडीएफसीने पुन्हा 5 बेसिस पॉईंट वाढीची घोषणा केली आहे.
रेपो रेटचं कनेक्शन
रिझर्व्ह बँकेद्वारे अखत्यारीतील बँकांना भाग भांडवलाचा पुरवठा केला जातो. त्या दरास रेपो दर म्हटले जाते. रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराचा परिणाम अन्य बँकांच्या दरावर थेट जाणवतो. रिझर्व्ह बँकेने रेपो दर जैसे थे ठेवले आहे. त्यामुळे बँकांच्या दरात कोणतीही वाढ नोंदविली गेली नव्हती. रेपो दरात वाढ केल्यास बँकांना आपल्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या दरात वाढ करणे आवश्यक ठरते. रेपो दरात वाढ झाल्यास लेडिंग रेटमध्ये निश्चितपणे वाढ होते. त्यामुळे आगामी काळातील रिझर्व्ह बँकांच्या धोरणांकडे लक्ष लागले आहे.
एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँक ही एक गृहनिर्मितीसाठी कर्ज पुरवठा करणारी अग्रगण्य वित्तीय संस्था मानली जाते. देशभरातील ग्राहकांना व्याज दरांत कर्ज प्रदान केले जाते.