Home Loan Insurance : गृहकर्जाला द्या विम्याचे संरक्षण, का आहे गरज, केव्हा होतो फायदा
Home Loan Insurance : गृहकर्जाला विम्याचे संरक्षण दिल्यास तुमचा मोठा फायदा होईल.
नवी दिल्ली : स्वप्नातील इमला प्रत्यक्षात येणे अथवा तसे घर खरेदी करणे ही मोठी गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीत दीर्घकालावधीनंतर जोरदार परतावा मिळतो. जर तुम्ही घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज (Loan) घेत असाल तर त्यावर मासिक EMI द्यावा लागतो. तुम्ही जीवंत असेपर्यंत या घराचा मासिक हप्ता (Monthly EMI) तुम्ही नियोजन करुन सहज चुकता करु शकता. परंतु, अचानक काही दुर्घटना घडल्यास, ईएमआय कोण चुकविणार, कुटुंबाला त्याचा बोजा कसा पेलावणार अशा समस्या उद्भवतात. अशावेळी गृहकर्जाला विमा संरक्षण (Home Loan Insurance) देणे आवश्यक आहे.
अनेक बँका आता गृहकर्जासोबत विमा संरक्षण (Home Loan Insurance) देतात. हा विमा आपल्या घराला संरक्षण (Home Loan Protection) देतो. त्यामुळे कर्जदाराला काही झालेच, तर त्याचे उर्वरीत गृहकर्ज त्याच्या कुटुंबाला भरावे लागत नाही. तर हे कर्ज विम्यातून चुकते केले जाते.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे (IRDA) गृहकर्ज विमा (Home Loan Insurance) संबंधीचे स्पष्ट दिशानिर्देश नाहीत. हा विमा घेण्याविषयी कुठलीही जबरदस्ती करण्यात येत नाही. पण अनेक बँका गृहकर्जासोबतच विमा संरक्षण देतात.
गृहकर्ज विमा हा घर खरेदी करणाऱ्याला, कर्जदाराला दिलासा देणारा विमा आहे. हा विमा तुमच्या घराला विम्याचे संरक्षण देतो. गृहकर्ज लाखात असते आणि त्याची प्रचंड उधारी कर्जदारावर असते. त्याच्याच जीवीताला धोका उत्पन्न झाल्यास उर्वरीत कर्जाची रक्कम या विम्यातून चुकती करण्यात येते.
अशा प्रकरणात कर्जदाराच्या कुटुंबियांवर कर्जाचा कुठलाच बोजा येत नाही. घरावर जप्ती येत नाही. कर्जदाराचा मृत्यू झाल्यास, विमा रक्कमेतून उर्वरीत कर्जाची रक्कम वळती करण्यात येते. विमा कंपन्या बँका, खासगी गृहकर्ज देणाऱ्या कंपन्यांना कर्जाची परतफेड करतात.
ग्राहकाला गृहकर्ज विमा एकरक्कमी अथवा मासिक ईएमआय (Home Loan EMI) मध्ये सुद्धा विम्याची रक्कम कपात होऊ शकते.त्यासाठी तुम्ही दोनपैकी एक पर्याय निवडू शकता. आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळते.