HOME LOAN: महाग कर्जाची चिंता सोडा; जाणून घ्या, तुमच्या आवाक्यातील होम लोनचे पर्याय

रिझर्व्ह बँकेने रेपो दर जैसे थे ठेवले आहे. त्यामुळे बँकांच्या दरात कोणतीही वाढ नोंदविली गेली नव्हती. रेपो दरात वाढ केल्यास बँकांना आपल्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या दरात वाढ करणे आवश्यक ठरते. रेपो दरात वाढ झाल्यास लेडिंग रेटमध्ये निश्चितपणे वाढ होते. त्यामुळे ग्राहकांना अधिक व्याजदराने कर्ज घ्यावे लागण्याची शक्यता आहे.

HOME LOAN: महाग कर्जाची चिंता सोडा; जाणून घ्या, तुमच्या आवाक्यातील होम लोनचे पर्याय
होम लोनImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 10:48 PM

नवी दिल्ली : सर्वसामान्यांना महागाईच्या तीव्र झळा बसण्याची शक्यता आहे. इंधनापासून खाद्यपदार्थ्यांच्या किंमतीत वाढ झाली असताना सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर (Reserve bank repo rate) वाढीचा आकस्मिक झटका अर्थवर्तृळाला दिला आहे. त्यामुळे बँकिंग जगतातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून थेट घर मागणीवर परिणाम होण्याची संभाव्यता व्यक्त केली जात आहे. रेपो दर वाढीनंतर विविध बँका आणि वित्तीय आस्थापने कर्ज दरात वाढ करण्याची दाट शक्यता आहे. गृह वित्त क्षेत्रातील आघाडीची एचडीएफसीने आरपीएलआर मध्ये 5 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. मे 2022 पासून नवीन दर लागू केले जाणार आहे. बँकांच्या गृहकर्जाचं (Home loan) कनेक्शन रेपो दराशी असतं.रिझर्व्ह बँकेद्वारे अखत्यारीतील बँकांना भाग भांडवलाचा पुरवठा केला जातो. त्या दरास रेपो दर म्हटले जाते. रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराचा परिणाम अन्य बँकांच्या दरावर थेट जाणवतो.

..घर महागणार :

रिझर्व्ह बँकेने रेपो दर जैसे थे ठेवले आहे. त्यामुळे बँकांच्या दरात कोणतीही वाढ नोंदविली गेली नव्हती. रेपो दरात वाढ केल्यास बँकांना आपल्या ग्राहकांना देण्यात येणाऱ्या दरात वाढ करणे आवश्यक ठरते. रेपो दरात वाढ झाल्यास लेडिंग रेटमध्ये निश्चितपणे वाढ होते. त्यामुळे ग्राहकांना अधिक व्याजदराने कर्ज घ्यावे लागण्याची शक्यता आहे.

पर्याय बजेटमध्ये :

तुमच्या बजेटच्या आवाक्यात योग्य ठरणारे गृहकर्जाचे विविध पर्याय देखील उपलब्ध आहेत. प्रमुख वित्तीय आस्थापनांचे व्याज दर आणि गृहकर्ज प्रक्रिया शुल्क जाणून घेऊया-

हे सुद्धा वाचा

· कोटक महिंद्रा बँकेच्या गृहकर्जाची सुरुवात 6.60% पासून होते. प्रक्रिया शुल्क गृहकर्जाच्या 0.50 टक्के आकारले जाते.

· सिटीबँकेचा गृहकर्जाचा दर 6.75% आहे आणि प्रक्रिया शुल्क अंदाजित 10000 रुपये असेल.

· यूनियन बँक ऑफ इंडियाचा व्याजदर 6.60% आहे.

· बँक ऑफ बडौदाचा व्याजदर 6.50 टक्के आहे. प्रक्रिया शुल्क 8500-25000 रुपयांपर्यंत असेल.

· स्टेट बँकेचा व्याजदर 6.65 टक्के असून प्रक्रिया शुल्क स्वरुपात 0.35% रकमेची आकारणी केली जाते.

· एचडीएफसी लिमिटेडचा व्याजदर 6.70 टक्के असून 3000-5000 पर्यंत प्रक्रिया शुल्क घेतले जाते.

· एलआयसी हाऊसिंग फायनान्स व्याजदर 6.90 टक्के आहे. प्रक्रिया शुल्क 10-15 हजार आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.