Inflation : घर घ्यायचंय आत्ताच घ्या; येत्या दोन वर्षांत किमती 6 ते 7 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज, ‘या’ कारणांमुळे महागणार घरे

घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढील काळात घरांच्या दरात तेजी येणार असून, घराचे दर सहा ते सात टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.

Inflation : घर घ्यायचंय आत्ताच घ्या; येत्या दोन वर्षांत किमती 6 ते 7 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज, 'या' कारणांमुळे महागणार घरे
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 8:51 PM

मुंबई : नोटबंदी, जीएसटी (GST) आणि कोरोनासारखे (Corona) झटके सहन केल्यानंतर आता कुठं बांधकाम क्षेत्रात थोडी मागणी वाढली असताना नवं संकट उभं राहिलंय. बांधकाम साहित्याची महागाई (Inflation) आणि कर्जावरील वाढत्या व्याज दरामुळे बाजारात पुन्हा अस्थिरता आली आहे. एप्रिल-मे महिन्यातच देशातील अनेक शहरांमध्ये घरं दहा टक्क्यानं महाग झाली आहेत. यावर्षी देशभरात घरांच्या किमती सरासरी 7.5 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वाधिक वाढ असणार आहे. तर 2023 आणि 2024 मध्ये किमती सहा टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयकडून व्याज दरात वाढ सुरू आहे. मेमध्ये रेपो रेटमध्ये 40 बेसिस पॉईंट आणि चालू महिन्यात 50 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. बांधकामासाठी लागणारा कच्चा माल आणि महाग कर्जामुळे घराच्या किमती वाढत आहेत.

परवडणाऱ्या घरांची संख्या घटली

2021 या वर्षात देशातील सात प्रमुख शहरांत 2.37 लाख घर बांधण्याची घोषणा झाली. यातील 63 टक्क्यांहून अधिक जास्त घरं मध्यम आणि मोठी घरं आहेत. यातील परवडणाऱ्या घरांची संख्या 26 टक्के आहे. 2019 मध्ये 40 टक्के घरं परवडणाऱ्या श्रेणीत होती, अशी माहिती प्रॉपर्टी फर्मकडून देण्यात आली आहे. 40 लाख रुपयांपर्यंतचे घरं ही परवडणाऱ्या श्रेणीत तर यावरील किमतीची घरं मध्यम आणि मोठी घरं असतात. 2021 मध्ये 8 मोठ्या शहरांत परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत घट होऊन ती 43 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. 2020 मध्ये 48 टक्के परवडणाऱ्या घरांची विक्री झाली होती.

हे सुद्धा वाचा

रिटेल कर्जात तेजी

एप्रिल 2022 च्या आकडेवारीनुसार रिटेल कर्जात 14.7 टक्क्यानं तेजी आलीये. यात सर्वाधिक वाटा हा गृहकर्ज आणि वाहन कर्जाचा आहे. गृहकर्जात 13.7 टक्क्यांनी वाढ झालीये .एप्रिल 2021 मध्ये हेच प्रमाण 9.9 टक्के एवढे होते. अशी माहिती आरबीआयच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे कमी किंमत असलेल्या घरांसाठी कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण 6.1 टक्क्यांवरून 4.6 टक्क्यांवर आले आहे. म्हणजेच लहान घर घेणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. कच्चा मालाच्या किंमतीतील वाढ आणि गृहकर्ज महाग झाल्यानं परवडणाऱ्या घरांच्या मागणीत घट झालीये. तसेच जीवनशैलीत बदल झाल्यामुळे अनेक जण आता परवडणाऱ्या घराऐवजी मध्यम आणि मोठी घर घेत आहेत, अशी माहिती मॅपल ग्रुपचे संचलाक क्रुणाल दायमा यांनी दिली आहे. म्हणजेच श्रीमंत लोकांची मोठ्या घरांची मागणी वाढल्यानं घरांच्या किमती वाढल्या आहेत, आणि वाढलेल्या भावामुळे कर्ज आणि बांधकामाचा खर्च वाढत चाललाय.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.