घरांच्या किमती वाढल्या; जाणून घ्या का वाढतायेत घरांचे दर?

घर बांधकामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती 1 वर्षापासून महागल्या आहेत. सिमेंट, लोखंड, स्टील, तांबे आणि अ‍ॅल्युमिनियमसह प्रत्येक वस्तूंचे भाव वाढले आहेत . वर्षभरात सिमेंटच्या किमती 22 टक्के, स्टील 30 टक्के, तांबे आणि अ‍ॅल्युमिनियमच्या दरात उच्चांकी अशी वाढ झालीये.

घरांच्या किमती वाढल्या; जाणून घ्या का वाढतायेत घरांचे दर?
घर खरेदी करणे होणार महाग
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 5:30 AM

नाशिक (Nashik) येथे राहणाऱ्या कृष्णानं घर घ्यायचं ठरवलं. बँकेत लोनची प्रक्रिया पूर्ण करून डाऊन पेमेंटची (Down payment) कसरतही पूर्ण केली. एवढे सर्व करून देखील त्याचं घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. एकीकडे बिल्डरनं (Builder) सूट तर दिलीच नाही, याऊलट घरांच्या किंमती 7 ते 10 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. वाढत्या महागाईमुळे कर्जही महाग होणार आहे. त्यामुळे कृष्णानं घर खरेदीचा निर्णय काही दिवस स्थगित केलाय. पण या घरांच्या किंमती का वाढत आहेत हे समजून घेऊया. घर बांधकामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती 1 वर्षापासून महागल्या आहेत. सिमेंट, लोखंड, स्टील, तांबे आणि अ‍ॅल्युमिनियमसह प्रत्येक वस्तूंचे भाव वाढले आहेत . वर्षभरात सिमेंटच्या किमती 22 टक्के, स्टील 30 टक्के, तांबे आणि अ‍ॅल्युमिनियमच्या दरात उच्चांकी अशी वाढ झालीये. तसेच पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे वाहतूक खर्च देखील वाढलाय. कामगारांची मजुरी देखील वाढलेली आपल्याला दिसून येते.

घराच्या खर्चाचे वर्गीकरण

बांधकामाच्या एकूण खर्चात 67 टक्के कच्चा माल , मजुरी 28 टक्के आणि इंधनाचा खर्च 5 टक्के याचा समावेश असतो, असं रिअल इस्टेट कंपनी कॉलिरसच्या एका अहवालातून माहिती समोर आली आहे. बांधकामाला लागणारा सर्वच कच्चा माल महाग झालाय. वर्षभरात बांधकामाच्या खर्चात जवळपास 10 ते 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी गृहनिर्माण बांधकामाचा खर्च 2060 रुपये प्रती चौरस फूट होता, तो आता 2300 रुपये झाला आहे. दुसरीकडे औद्योगिक बांधकामाचा खर्च देखील वाढला आहे. कोरोना महामारीमुळे बांधकाम क्षेत्रात मंदी आली होती. आता संपूर्ण निर्बंध उठवल्यानंतरही बांधकाम क्षेत्रात मागणी वाढली नाही. तरीही बिल्डरांनी घरांच्या किंमती वाढवल्या आहेत. तसेच देशातील प्रमुख 8 शहरांमध्ये जानेवारी ते मार्च 2022 या कालावधीत घरांच्या विक्रीत दरवर्षी 7 टक्के वाढ झाली आहे. याच कालाववधीत घरांच्या किंमतीतही सरासरी 7 टक्क्यांनी वाढ झालीये, असे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी फर्म प्रॉपटायगरनं अहवालात माहिती दिलीये.

कच्च्या मालाच्या किमती आणखी वाढणार

सिमेंट, लोखंड, आणि इतर कच्च्या मालाच्या किमतीत आणखीन वाढ होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे यापुढेही घरांच्या किंमती अजून वाढू शकतात, असं कॉलिरसचे सीइओ रमेश नायर सांगतात . यासोबतच डिसेंबरपर्यंत घर बांधकामाचा खर्च 8 ते 9 टक्क्यानं वाढण्याचा अंदाजही नायर यांनी वर्तवलाय. त्यामुळे आता एकूणच सर्वसामान्य नागरिकांसाठी तयार होणाऱ्या परवडणाऱ्या घराचं स्वप्न महाग होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

सर्व जगातच इंधनाचे दर वाढले, अमेरिकेत पेट्रोलच्या भावात 55 टक्क्यांची वाढ; इंधन दरवाढीवर सरकारचे स्पष्टीकरण

Semiconductor crisis: सेमीकंडक्टरचा तुटवडा वाहन उद्योगाच्या मुळावर, वाहन विक्रीत मोठी घट

IIT Kanpur : बापरे बाप! शंभर कोटींची गुरुदक्षिणा, कोण आहे देणगी देणारा कोट्यधीश विद्यार्थ्यी?

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.