Amazon आणि Flipkart वर इतक्या स्वस्तात वस्तू कशा मिळतात? अशी आहे इनसाईड स्टोरी
Flipkart आणि Amazon सेलवर मोठी सूट मिळूनही या कंपन्या कोट्यवधींचा नफा कामविल्याचा दावा करतात. हे त्यांच्यासाठी कसे शक्य आहे जाणून घेऊया.
मुंबई, ऑनलाइन विक्रीमुळे (Online Shopping) लोकांची खरेदी करण्याची पद्धत बदलली आहे. पूर्वी दुकानात जाऊन खरेदी करण्याला पहिली पसंती राहत असे. आता व्यवहारापासून ते खरेदीपर्यंत सर्व काही ऑनलाइन झाले आहे. मात्र आता ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देण्यात येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ऑनलाइन मार्केट प्लेसवर मिळणारी सवलत आणि विकत घेतलेल्या वस्तूंची रिटर्न पॉलिसी आहे. आयफोनबद्दलच बोलायचे झाले तर, आयफोन 13 फ्लिपकार्ट-अमेझॉनवर 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत विकला गेला आहे. (Online Business Model)
कमी किमतीत विकू शकणारे उत्पादन या कंपन्या कुठून आणतात, हा प्रश्न आहे. एखादे उत्पादन कमी किमतीत विकून ते नफा कसा मिळवतात? या संपूर्ण प्रक्रियेची व्यावसायिक संकल्पना काय आहे ते जाणून घेऊया.
लहान व्यवसायांना प्रोत्साहन देऊन
MSMEs ला प्रोत्साहन देऊन, Amazon आणि Flipkart अधिक वस्तू स्वस्तात विकू शकतात. एमएसएमई म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. यामुळे ई-मार्केट प्लेसवर उत्पादने स्वस्तात मिळतात.
दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म स्वस्तात वस्तू विकण्यासाठी स्थानिक व्यवसाय मालक आणि इतर एमएसएमईशी संपर्क साधतात. अलीकडेच ॲमेझॉनने सांगितले होते की, कोट्यवधी ग्राहक एमएसएमई आणि स्थानिक व्यवसायांची उत्पादने पसंत करत आहेत.
कंपन्या स्वस्तात वस्तू का विकतात?
कोणत्याही कंपनीच्या वेबसाइटवर पाहिल्यास तेथील उत्पादनाची किंमत Amazon-Flipkart पेक्षा जास्त आहे. मग प्रश्न येतो की या कंपन्या आपली उत्पादने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर स्वस्तात का विकतात? याचे कारण म्हणजे जास्तीत जास्त माल विकून नफा मिळवणे. हा एका प्रकारे होलसेलचा व्यवसायासारखाच प्रकार आहे.
येथे ब्रँड त्यांचे मार्जिन कमी करून अधिक उत्पादने विकल्या जाते. दुसरे, त्यांना ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टवर ग्राहकांचा मोठा गट मिळतो. ब्रँड्सना प्रत्येक उत्पादनावर कमी नफा असू शकतो मात्र मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने त्यांचा एकूण नफा मोठ्या प्रमाणात मिळतो.
बँक ऑफरचे फायदे
क्रेडिट कार्ड वर खरेदी केल्यास इलेक्ट्रिक उपकरणाच्या खरेदीवर सवलत मिळते याशिवाय इएमआयचा पर्याय देखील उपलब्ध असतो. याचा फायदा कंपन्यांनाही मिळतो. वास्तविक, विक्रीमध्ये दर्शविलेली किंमत सर्व सवलतींनंतर असते. यामध्ये बँक ऑफर्सचाही समावेश आहे. यामुळे कंपन्या आपला माल स्वस्तात विकू शकतात.