शेअर बाजारात गुंतवणुकीबद्दल फार काही माहिती नसते त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुमच्या आर्थिक लक्ष्यांनुसार म्युच्युअल फंड योजना निवडू शकतात.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही पीएसयू इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. कारण, यामध्ये तीन महिन्यांत बक्कळ परतावा दिला जात आहे. सध्या हा टक्का 27.29 इतका आहे.
अशात एफडीवर फक्त 5 टक्के व्याज मिळतं. त्यामुळे तुम्ही म्युच्युअल फंडामधील गुंतवणूकदारांचे पैसे लवकर दुप्पट होतात.
गेल्या तीन महिन्यामध्ये आदित्य बिर्ला सन लाइफ पीएसयू इक्विटी फंडाने तब्बल 31.39 परतावा दिला आहे. तर तीन महिन्यांत हा परतावा 21.86 टक्के आहे. यामध्ये एका वर्षाचा परतावा 5.80 टक्के इतका आहे. एसबीआय पीएसयू फंडाने 6 महिन्यांत 24.07 म्हणजेच 15 टक्के परतावा दिला आहे.
एका वर्षात SBI एफडीवर 5% परतावा देते – स्टेट बँक ऑफ इंडिया 7 दिवस ते 45 दिवसांत मॅच्यूअर एफडीवर 2.9% व्याज देते तर 1 वर्षापासून 2 वर्षाच्या कालावधीत एफडीला 5% परतावा मिळतो. 2-3 वर्षांच्या मुदतीच्या एफडीवर 5.10% व्याज तर 5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत 5.40% व्याज दिलं जात आहे.
संग्रहित छायाचित्र.
icici bank
म्युच्युअल फंडामधून कसे कमवाल पैसे? -तुम्ही कुठल्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. इतकंच नाही तर तुम्ही एखाद्या ऑनलाईन अॅप किंवा म्युच्युअल फंड अॅडव्हायझरच्या मदतीनेही गुंतवणूक करू शकता.
– यामध्ये जर तुम्ही थेट गुंतवणूक केली तर तुम्हाला म्युच्युअल फंड योजनेचा थेट फायदा होईल. जर तुम्ही सल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक केली तर तुम्हाला म्युच्युअल फंड योजनेच्या नियमित योजनेत गुंतवणूक करता येईल.
– जर तुम्हाला थेट गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडाच्या वेबसाइटवर जा. सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांसह तुम्ही गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंडाच्या थेट योजनेत गुंतवणूकीचा फायदा म्हणजे तुम्हाला कमिशन देण्याची गरज परड नाही.