Hindenburg Income : हिंडनबर्ग संस्था कमाईतही नाही मागे, झटपट अशी कमाविते कोट्यवधी रुपये

Hindenburg Income : अदानी समूहाची घडी विस्कटवणाऱ्या हिंडनबर्गची कमाई होते तरी कुठून? त्यांचे उत्पन्न येते तरी कुठून? या प्रश्नांचे उत्तरे शोधण्याचा प्रयत्न..

Hindenburg Income : हिंडनबर्ग संस्था कमाईतही नाही मागे, झटपट अशी कमाविते कोट्यवधी रुपये
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 10:23 AM

नवी दिल्ली : भारतातच नाही तर जगात हिंडनबर्ग संशोधन संस्थेचे (Hindenburg Research Firm) नाव गाजत आहे. या अमेरिकन संस्थेने जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंताला हिसका दाखविला आहे. त्याच्या साम्राज्याला हादरवले. एकीच मारा, लेकिन सॉलिड मारा, अशा संवादाची आठवण करुन देणाऱ्या या संस्थेचे कार्य काय आहे, तिला उत्पन्न (Income) कुठूने येते. तिच्या कमाईचे साधन तरी काय? तिला कोण कोण निधी, अर्थसहाय्य करते का? असे एक नाही तर अनेक प्रश्न भारतीयांच्या मनात घोळत आहे. अदानी समूहाला (Adani Group) अब्जावधींचा फटका देणारी ही संस्थाही अब्जावधींची कमाई करते, हे ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. ही एक सामाजिक संस्था आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे खूळ बाजूला सारा. कारण ही संस्था मोठ्या उद्योग समूहांचे पितळ तर बाहेर काढतेच पण त्यातूनच ती कमाई पण करते.’ नहेले पे देहला’ उगीच म्हणत नाही, हे तुम्हाला आता कळेलच.

24 जानेवारी 2024 रोजी पासून हिंडनबर्ग संस्था भारतात चर्चेत आली. पण या संस्थेने यापूर्वीही जगात वादळं आणली आहेतच. अदानी समूहावर हिंडनबर्गने उठसूठ आरोप केलेले नाहीत. त्यासाठी अदानी समूहाचा त्यांनी दोन वर्षे अभ्यास केला. संशोधन केले. त्यांच्या व्यापाराची, शेअर बाजारातील धोरणांचा अभ्यास केला. त्यांच्या चढत्या आलेखाचे संशोधन केले. त्यानंतर जे बाहेर आले ते जगासमोर आहे.

हिंडनबर्ग हे काम एखाद्या स्पाय एजन्सी सारखं करते. गुप्तहेर संस्था कशा काम करतात. तसाच थोडासा प्रकार म्हणायचा. या संस्थेने अदानी समूहातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी या ना त्या मार्गाने जवळीक साधली. त्यांनी दिलेल्या कागदपत्रांचा पडताळा केला. त्यानंतर रिसर्च रिपोर्ट जगासमोर आणला. अर्थात या अहवालावर अदानी समूहाने त्यांची बाजू मांडली आहे.

हे सुद्धा वाचा

हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहातील शेअरला गळती लागली. हे शेअर धडाधड जमिनीवर आले. अदानी यांच्या या घसरणाऱ्या शेअरमुळे हिंडनबर्ग संस्थेला मोठा फायदा झाला. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. तर हिंडनबर्गने अदानी समूहातील शेअर शॉर्ट पॉझिशनवर अगोदरच घेऊन ठेवले होते.

एवढेच नाही तर अदानी समूह अमेरिकेतील शेअर बाजारात ही आहे. त्याठिकाणीही हिंडनबर्गने अदानी समूहाच्या कंपन्यांच्या बाँडमध्ये शॉर्ट पोझिशन घेतलेली आहे. आता जेवढी अदानी समूहाची पडझड होईल. तेवढा या संस्थेला फायदा होणार आहे.

हिंडनबर्गला शॉर्ट सेलर म्हणतात. शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून ही रिसर्च फर्म कमाई करते. अदानी समूहावर तुटून पडलेल्या हिंडनबर्गने याच समूहाचे शेअर खरेदी करुन ठेवलेले आहेत. शॉर्ट पोझिशनच्या माध्यमातून संस्था कमाई करणार आहे.

आता तुम्ही म्हणाल हे शॉर्ट सेलिंग काय प्रकार असतो? तर शेअर बाजारात दोन प्रकारे पैसे कमाविता येतात. पहिला प्रकार म्हणजे शेअर खरेदी करायचे आणि शेअरची किंमत वाढली तरी त्याची विक्री करुन नफा कमवायचा. त्यातून कमाई करायची. याप्रकाराला लाँग पोझिशन म्हणतात.

तर दुसऱ्या प्रकारात ब्रोकरकडून काही शेअर उधार घेऊन ते बाजारात अगोदर विक्री करण्यात येतात. जेव्हा या शेअरची किंमत पडते, घसरते, तेव्हा त्या कमी किंमतीत हे शेअर खरेदी करण्यात येतात. त्यावेळी नफा होतो. त्याला शॉर्ट सेलिंग वा शॉर्ट पोझिशन असे म्हणतात.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.