2000 Rupees Note : 2000 रुपयांच्या इतक्या नोटा आल्या परत, SBI ने मांडला सर्व लेखाजोखा

2000 Rupees Note : देशातील गुलाबी नोटांची घर वापसी सुरु झाली. 23 मे रोजीपासून 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यात येणार आहे. एसबीआय किती नोटा परत आल्या याचा लेखाजोखा मांडला आहे.

2000 Rupees Note : 2000 रुपयांच्या इतक्या नोटा आल्या परत, SBI ने मांडला सर्व लेखाजोखा
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 6:53 PM

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 19 मे रोजी 2000 रुपयांच्या नोटा परत मागविण्याची घोषणा केली. 23 मे 2023 रोजीपासून बँकांमध्ये या नोटा बदलण्यात येत आहेत. 30 सप्टेंबर 2023 रोजीपर्यंत 2000 रुपयांची नोटा बदलण्यात येतील. गेल्या आठवड्यात 2000 रुपयांच्या किती नोटा परत आल्या याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) दिली आहे. 23 ते 29 मे दरम्यान 2000 रुपयांच्या किती नोटा बदलण्यात आल्या याची माहिती एसबीआयने दिली आहे. 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरण्याची गरज नाही.

किती मुल्याच्या नोटा बदलविल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांच्या माहितीनुसार, अंदाजे 17,000 कोटी रुपये मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा खात्यात जमा करण्यात आल्या, वा एसबीआयमध्ये बदलविण्यात आल्या. एसबीआय ला 14,000 कोटी रुपये मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोट मिळाल्या आहेत तर बँकेने 3000 कोटी रुपये मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा बदलविल्या आहेत. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत. ते 30 सप्टेंबर 2023 रोजीपर्यंत या नोटा बदलवू शकतात.

2000 रुपयांची नोट व्यवहारात वापरता येईल? RBI ने स्पष्ट केल्यानुसार, नागरिकांना ही नोट व्यवहारात, खरेदी-विक्रीसाठी वापरता येईल. तिचे सार्वजनिक व्यवहारातील महत्व अजूनही अबाधित आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपूर्वी 2000 रुपयांची खात्यात जमा करता येतील.

हे सुद्धा वाचा

2000 रुपयांची नोट असेल तर हे करा देशातील नागरिकांना या नोटा खात्यात जमा करता येतील, अथवा त्या बदलवीता येतील. नोट एक्सचेंज करण्यासाठी ही सुविधा 30 सप्टेंबरपर्यंत असेल. सार्वजनिक बँका, व्यावसायिक माध्यम केंद्र आणि आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयात या नोटा बदलविता येतील.

एका दिवशी इतक्या नोटा बदला आरबीआयच्या गाईडलाईननुसार, जर एखादी व्यक्ती 2000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये घेऊन बँकेत जातील. तर त्याच्याकडे कोणतीही विचारपूस न करता नोट बदलवून देण्यात येतील. एका दिवशी 20,000 रुपयांपर्यंत नोट बदलता येतील.

व्यावसायिक माध्यम केंद्रात इतक्या नोटा बदला बँकांच्या व्यावसायिक माध्यम केंद्रात किती नोटा बदलता येतील, असा एक सवाल विचारण्यात येतो. तर या बिझनेस करस्पॉन्डेंट सेंटरवर खातेदाराला 4000 रुपयांपर्यंत नोटा बदलविता येतील.

खाते नसताना बदला नोटा बँकेचे खाते नसेल तरीही तुम्हाला 2000 रुपयांच्या नोटा बदलविता येतील. त्यासाठी तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. एका दिवशी 20,000 रुपयांच्या नोटा बदलविता येतील.

पोस्ट खात्यात जमा करा पोस्टाच्या बचत खात्यात, अथवा इतर खात्यात तुम्हाला 2,000 रुपयांच्या नोटा जमा करता येतील. या नोटा चार महिने अथवा पुढील आदेश येईलपर्यंत वैध असल्याने तुम्ही त्या जमा करु शकता. तसेच पोस्ट ऑफिसमधील सेवांचा लाभ घेण्यासाठी अथवा स्टॅम्प वा इतर खरेदीसाठी या नोटांचा वापर करता येईल. तुम्ही रजिस्ट्री अथवा स्पीड पोस्टासाठी या नोटांचा वापर करु शकता. तसेच 2,000 रुपयांच्या नोटा देऊन तुम्ही मनीऑर्डर पण करु शकता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.