गेल्या पाच वर्षात ‘या’ लोकांकडून सर्वाधिक सोन्याची खरेदी, पहिल्या क्रमांकावर कोण?
गोल्ड हबने नुकतंच सोने खरेदीबाबतचा एक रिपोर्ट तयार केला आहे. (Last Five Years Gold Bought By Different Sector)
मुंबई : जगभरातील असंख्य धातूंमध्ये सोन्याला फार जास्त मागणी असते. सर्वसामान्य लोकांपासून विविध गुंतवणूकदारांची नजर ही सोन्याच्या भावावर असते. सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित मानली जाते. त्यामुळे अनेकजण वर्षातून एकदा तरी सोने खरेदी करतात. गेल्या पाच वर्षात सर्वात जास्त सोन्याची खरेदी कोणी केली? याची माहिती समोर आली आहे. गोल्ड हबने याबाबतचा एक रिपोर्ट तयार केला आहे. (Last Five Years Gold Bought By Different Sector)
2016 या वर्षात सर्वाधिक 1072 टन सोने गुंतवणूकदारांनी खरेदी केले. यात सोन्याच्या नाण्यांचा समावेश आहे. तर यात दुसऱ्या क्रमांकावर सर्वसामान्य लोकांचा समावेश आहे. ज्यात सर्वसामान्य लोकांनी 953 टन सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली.
त्यानंतर 2017 मध्ये सर्वसामान्य लोकांनी सर्वाधिक सोन्याची खरेदी केली. त्यात 1060 टन सोने दागिन्यांच्या रुपात खरेदी करण्यात आले. पण 2017 या वर्षात गुंतवणूकदार मात्र दुसऱ्या स्थानावर पाहायला मिळाले. 2017 मध्ये 725 टन सोन्याची खरेदी करण्यात आली.
त्यापाठोपाठ 2018 मध्ये पुन्हा एकदा सर्वसामान्य लोकांनी सर्वाधिक सोन्याची खरेदी केली. यात 1051 टन सोन्याचा समावेश आहे. तर गुंतवणूकदारांनी 2018 मध्ये 572 टन सोने खरेदी केले. विशेष म्हणजे यात तिसऱ्या क्रमांकावर सरकारचा समावेश असून त्यांनी जवळपास 237 टन सोने खरेदी केले.
गेल्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये पुन्हा एकदा सर्वसामान्य लोकांनी सर्वाधिक दागिन्यांची खरेदी केली. 2019 मध्ये सर्वसामान्य लोकांनी 1064 टन सोन्याची खरेदी केली. तर गुंतवणूकदारांनी 594 टन सोने खरेदी केली. तर 385 टन सोने सरकारने खरेदी केले.
गोल्ड हबने दिलेल्या रिपोर्टनुसार, यंदाच्या वर्षात म्हणजे 2020 मध्ये कोरोना काळात गुंतवणूकदारांनी सोन्याची सर्वाधिक खरेदी केली. 2020 मध्ये गुतंतवणूकदारांनी 1130 टन सोन्याची खरेदी केली. मात्र यंदाच्या वर्षात सर्वसामान्य लोकांनी केवळ 572 टन सोन्याची खरेदी केली. (Last Five Years Gold Bought By Different Sector)
संबंधित बातम्या :
सोन्याच्या किंमतीत भाववाढ सुरुच, जाणून घ्या आजचे दर
स्वस्तात सोने खरेदी करायचंय, केंद्र सरकार देतंय या वर्षातली शेवटची संधी…!