भारतीय महिलांकडे सोन्याचा ‘ढीग’; इतके गोल्ड पाहून चक्रावले अमेरिका, फ्रान्स, जर्मनी

Gold Reserve Indian Women : भारतीय महिलांना दाग-दागिन्यांची मोठी हौस आहे. सणावाराला, लग्न समारंभात, कार्यक्रमात महिलांचा हा थाट आपण पाहतोच. पण भारतीय महिलांकडे किती सोने आहे? तुम्हाला माहिती आहे का?

भारतीय महिलांकडे सोन्याचा 'ढीग'; इतके गोल्ड पाहून चक्रावले अमेरिका, फ्रान्स, जर्मनी
भारतीय महिलांकडे इतकी आहे सोन्याची दौलत
Follow us
| Updated on: Jun 02, 2024 | 4:27 PM

भारतात लग्नकार्य असो वा इतर कार्यक्रम, घरातील महिलांची पहिली पसंती ही सोन्याच्या दागिन्यांना असते. आपल्या देशातील महिलांकडे किडूक-मिडूक का असेना पण सोने असते. सोने हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. परंपरा, चालीरिती, धार्मिक कार्य यादृष्टीने भारतीय समाजात सोन्याला महत्व आहे. सोने हे शुभ मानण्यात येते. पण देशातील महिलांकडे किती सोने असेल याचा काही अंदाज तुम्हाला बांधता येईल का?

भारतीय महिलांकडे आहे इतके सोने

World Gold Council च्या एका अहवालानुसार, भारतीय महिलांकडे जवळपास 24,000 टन सोने आहे. हे सोने म्हणजे जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे. खजिना आहे. WGC च्या अहवालानुसार,जगातील एकूण सोन्याच्या साठ्यापैकी भारतीय महिलांकडे 11 टक्के सोने आहे. अर्थात ते दाग-दागिने, बिस्किट, वीटा, नाणे अशा कोणत्याही स्वरुपात असेल. तुम्हाला ऐकून धक्का बसेल की, भारतीय महिलांकडे जितके सोने आहे, ते जगातील टॉप 5 देशांकडील सोन्याच्या साठ्यापेक्षा अधिक आहे.

हे सुद्धा वाचा

अमेरिका, जर्मनी सारख्या देशांकडे किती सोने?

अमेरिकेकडे एकूण 8000 टन सोने तर जर्मनीकडे 3,300 टन सोने आहे. याशिवाय इटलीकडे 2450 टन, फ्रान्स देशाकडे 2400 टन आणि रशियाकडे 1900 टन सोने आहे. त्यामानाने भारतीय महिलांकडे कित्येक पटीने अधिक सोने आहे. सोन्याची ही दौलत जगातील महासत्तांकडे पण नाही.

या राज्यातील महिलांकडे सर्वाधिक सोने

भारतात सोन्याचा सर्वाधिक वापर दक्षिणेत होतो. भारतातील दक्षिण राज्यातील महिला सोन्याचा सर्वाधिक वापर करतात. त्या सोन्याचे दागदागिने वापरतात. दक्षिण भारतात देशातील एकूण सोन्याच्या 40 टक्के सोने आहे. केवळ तामिळनाडूमध्ये 28 टक्के सोने आहे.

महागडे दागिने पहिली पसंती

भारतात चित्रपटातील अभिनेत्री असोत वा मोठ-मोठ्या उद्योगपती, कॉर्पोरेट कुटुंबातील महिला, अशा विशेष प्रसंगात सोन्याची दागिने वापरणे पसंत करतात. आपल्या देशात सण उत्सावाला सोने खरेदीचा प्रघात आहे. त्यामध्ये अक्षय तृतीया आणि दिवाळी यांना विशेष महत्व आहे. या कालावधीत सोन्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. सोन्याच्या दाग-दागिने खरेदीवर सर्वाधिक खर्च होतो.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.