डिजिटल गोल्डवर किती टॅक्स भरावा लागतो ?

डिजिटल गोल्डवर लॉग टर्म गेन टॅक्स आणि शॉर्ट टर्म गेन टॅक्स किती द्यावा लागतो ते जाणून घ्या

डिजिटल गोल्डवर किती टॅक्स भरावा लागतो ?
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 12:34 PM

डिजिटल गोल्डच्या बाबतीत सध्या लोकांचा इंटरेस्ट दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक जण डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करतात पण त्यांना कराचे गणित समजत नाही. तर आता हा कर कसा असतो. चला तर आता जाणून घेऊया. फिजिकल गोल्डप्रमाणे डिजिटल गोल्डवर देखील कर लागतो. डिजिटल वॉलेटमध्ये ठेवलेल्या डिजिटल गोल्ड 3 वर्षांच्या आत विकल्यानंतर झालेल्या नफ्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स मानला जातो. हा कॅपिटल गेन टॅक्स तुमच्या एकूण उत्पन्नात जोडला जातो आणि त्यावर टॅक्स स्लॅबनुसार कर लागतो. तेच सोने 3 वर्षानंतर विकले असता लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स मानला जातो. यावर इंडक्सेशन बेनीफिट नंतर 20% कर लागतो.

तेच डिजिटल गोल्ड खरेदी केल्यास 3 % GST लागतो. अशावेळी गुगल पे, पेटीएम आणि फोन पेच्या माध्यमातून जितक्या वेळा डिजिटल गोल्ड खरेदी केले जाईल तितक्या वेळा GST द्यावा लागेल. डिजिटल गोल्ड ज्वेलरीमध्ये केले तर त्यावर मेकिंग चार्जेस आणि डिलिव्हरी फी लागते.

डिजिटल गोल्ड आणि फिजिकल गोल्डव्यतिरिक्त सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा अजून एक मार्ग म्हणजे पेपर गोल्ड. सॉव्हरेन गोल्ड बॉंड सोडल्यास गोल्ड ETF आणि गोल्ड म्युच्युअल फंडांची युनिट रिडिम केल्यास आणि विकल्यास फिजिकल गोल्ड प्रमाणे कर लागतो.

सॉव्हरेन गोल्ड बॉंडच्या बाबतीत कराचे नियम वेगवेगळे आहेत. यामध्ये इन्व्हेस्टरला वर्षाला अडीच टक्के व्याज मिळते. हे व्याज गुंतवणूकदाराच्या उत्पन्नात जोडले जाते आणि त्यावर स्लॅबनुसार टॅक्स लागतो.

गोल्ड बॉंडचा मॅच्युरिटी पिरीयड 8 वर्षांचा असतो. मॅच्युरिटी होईपर्यंत ठेवल्यास कॅपिटल गेन टॅक्स नाही लागत.

गुंतवणूकदार सॉव्हरेन गोल्ड बॉंडला 5 वर्षानंतर प्री- मॅच्युअर रिडिम करू शकतो. जर 5 ते 8 वर्षामध्ये विकले तर त्यातून होणारा नफा लॉंग कॅपिटल गेन टॅक्स मानला जातो. यावर इंडक्सेशन बेनिफिटनंतर 20 % टॅक्स लागेल.

डिमॅट फॉर्ममध्ये असल्यास बॉंडच्या स्टॉक एक्सचेंजच्या खरेदी-विक्री होऊ शकते. यावर होल्डींग पिरीयडनुसार लॉंग आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागतो.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.