Repo Rate : EMI मध्ये कसा होतो बदल, किती होतो कमी आणि जास्त, हा फॉर्म्युला माहिती आहे का?

Repo Rate : रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ न केल्याने सगळ्यांनी सूटकेचा निश्वास सोडला. पण तुमच्या ईएमआयवर त्याचा काय परिणाम झाला. तो कमी-जास्त होण्याचा फॉर्म्युला काय

Repo Rate : EMI मध्ये कसा होतो बदल, किती होतो कमी आणि जास्त, हा फॉर्म्युला माहिती आहे का?
वाढता वाढता वाढे
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 11:01 AM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) घेतलेल्या भूमिकेचे सर्वच स्तरातून स्वागत झाले. महागाईने गांजलेल्या लोकांना वाढीव ईएमआयपासून तीन महिने तरी दिलासा मिळाला आहे. एप्रिल महिन्यात आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक झाली. यामध्ये रेपो दरात (Repo Rate) कुठलीही वाढ न करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे रेपो रेट 6.50 टक्क्यांवर थांबला. 1 एप्रिलपासून आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. या आर्थिक वर्षातील पहिल्याच बैठकीत पतधोरण समितीने सुखद धक्का दिला. 3-6 एप्रिल दरम्यान ही बैठक झाली. रेपो दरात गेल्या वर्षभरापासून वाढ सुरु होती. जवळपास 2.50 टक्क्यांची रेपो दरात वाढ झाली. रेपो दरात वाढ झाली की बँकांचे कर्ज महाग होतात. ईएमआय वाढतो. तर रेपो दर आणि ईएमआय (EMI) यांचे कनेक्शन समजून घेऊयात.

काय असतो रेपो दर आरबीआय देशातील व्यावसायिक बँकांना कर्ज पुरवठा करतात, त्याला रेपो दर असे म्हणतात. रेपो दरात वाढ झाली की आरबीआय बँकांना महागडे कर्ज देते. बँका कर्जाचा बोजा ग्राहकांवर टाकते. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावर व्याजदरात वाढ होते. आरबीआय महागाईत कर्ज कमी होण्यासाठी बाजारात लिक्विडिटी कमी करते. त्यासाठी रेपो दरात वाढ करण्यात येते.

रिव्हर्स रेपो रेट रिव्हर्स रेपो रेट या प्रकारात आरबीआय व्यावसायिक बँकांकडून कर्ज घेते. म्हणजे, या बँका आरबीआयकडे पैसे ठेव ठेवतात. त्यावर आरबीआय व्याज देते. रिव्हर्स रेपो दरात गेल्या काही दिवसांपासून काहीच बदल करण्यात आलेला नाही. सध्या हा दर 3.35 टक्के आहे.

हे सुद्धा वाचा

कर्ज महागल्याचा परिणाम आरबीआयने रेपो दरात वाढ केल्याने कर्ज महागतात. कर्ज महागल्याने दैनंदिन बाजारात रोख रक्कम कमी होते. त्यामुळे मागणी आपोआप घटते. लोक खिशात पैसा असताना वारेमाप खर्च करत नाही. हॉटेलिंग व इतर वायफळ खर्च कमी करतात. बचतीचे प्रमाण कायम असते. पण खर्च आटोक्यात येतो. महागाई दर आटोक्यात येण्यास मदत होते.

EMI चे ओझे किती वाढले रेपो दरात सातत्याने वाढ होत असल्याने कर्जदार वाढीव ईएमआयच्या ओझ्याखाली दबले. जर एखाद्या व्यक्तीने एपरिल 2022 मध्ये 30 लाख रुपयांचे कर्ज 20 वर्षांच्या परतफेडीच्या बोलीवर घेतले. त्यासाठी व्याजदर समजा 6.7 टक्के आहे. तर त्याला दरमहिन्याला 22,722 रुपये ईएमआय चुकता करावा लागेल. पण मे 2022 पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 2.50 टक्क्यांची वाढ केली. कर्जदाराला त्याचा फटका बसला. 6.7 टक्के व्याजर आता 9.2 टक्के झाला. त्याचा ईएमआयमध्ये कमाल पाच हजार रुपये वाढले. त्याचा ईएमआयचा हप्ता 22,722 रुपयांहून थेट 27,379 रुपये झाला. दर महिन्याला या व्यक्तीला पाच हजार रुपये जास्त मोजावे लागले.

बँकांची शाळा काही बँकांनी ईएमआयमध्ये वाढ न करता कालावधीत वाढ करण्याचे धोरण राबविले. म्हणजे तुमचे 20 वर्षांसाठीचे कर्ज पुढे दोन ते तीन वर्षांसाठी वाढले. त्यामुळे ईएमआयमध्ये सध्या वाढ दिसत नसली तरी कालावधी वाढल्याने ग्राहकांना अजून तीन वर्षे कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. रेपो दराचा त्याला असा फटका बसला.

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.