?बँकेची विश्वासार्हता – एखादी निश्चित ठेव करण्यापूर्वी बँकेची विश्वासार्हता तपासा. DICGC च्या डिपॉझिटरी विमा कार्यक्रमांतर्गत एफडी ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. याअंतर्गत 5 लाख रुपयांचा विमा उतरविला जातो. मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्याही बँकेचे क्रेडिट रेटिंग तपासा. तज्ज्ञांचे माहितीनुसार, एफडीमध्ये सर्व पैसे गुंतवण्याऐवजी गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या बँकांमध्ये गुंतवणूक करावी.
?व्याज – बँकेचा व्याज हा कालावधीच्या आधारावर आधारित असतो. बँकाचा व्याज दर हा बँक ते बँकवर अवलंबून असतात. हे ठेवीदाराच्या कालावधीवर आधारेदेखील अवलंबून असते. तुम्हाला मोठ्या प्रमाणात किंवा एकरकमी ठेवींवर जास्त व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारे व्याज दर हा बहुतेक बँकांकडून दिल्या जाणाऱ्या नियमित दरापेक्षा 0.5 टक्क्यांनी जास्त असते. गुंतवणूकीचा संपूर्ण कालावधीसाठी एफडीचा व्याज दर समान आहे.
?मुदतीपूर्वी पैसे काढणे : एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी मुदतीपूर्वी पैसे काढण्याबद्दलची माहिती घ्या. तसेच मुदतीपूर्वी पैसे काढण्यापूर्वी तुम्हाला दंड भरावा लागतो. बँकांनी लागू केलले्या व्याजदराच्या दंड 0.5 टक्क्यांवरून 1 टक्के करण्यात आली आहे. तर काही बँका या दंड न आकारता गुंतवणूकदारांना अकाली वेळेस एफडी तोडण्याची परवानगी देतात. तर अतिरिक्त निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, फिक्सड डिपॉझिटसाठी बँक निवडताना जर तुम्ही मुदतीपूर्वी पैसे काढलात तर त्यात तुम्हाला कमी दंड भरावा लागेल, अशा बँकाचा शोध घ्या.
?कर्ज- फिक्स्ड डिपॉडिटद्वारे काही गुंतवणूकदारांना कर्जाची सुविधा दिली जाते. त्यामुळे याचा फायदा कर्ज घेतेवेळी मिळतो. एखाद्या आर्थिक परिस्थितीत एखादी व्यक्ती त्याच्या ठेवीच्या 90 टक्के पर्यंत एफडीवर कर्ज घेऊ शकते. कर्जाची मुदत एफडी योजनेच्या जास्तीत जास्त कालावधीपर्यंत असू शकते. कारण जास्तीत जास्त कालावधीचा एफडी जास्तीत जास्त कालावधीपुरता मर्यादित असेल.
SBI: ना ऑनलाईन , ना बँकेत जाण्याची गरज, फक्त एका फोनवर तुमची बँकेतली कामं घरबसल्या होणारhttps://t.co/4FDXk6ACUn#SBI | #StatebankofIndia | #UtilityNews| #Busienss
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 23, 2021
(best fixed deposit plan with high interest rate)
संबंधित बातम्या :
पॅनकार्ड मोफत मिळतेय अवघ्या 10 मिनिटांमध्ये, इन्कम टॅक्स विभागाच्या सेवेबद्दल जाणून घ्या
PMSBY Scheme : 31 मेपूर्वी बँक तुमच्या खात्यातून 12 रुपये कापणार, ग्राहकांना 2 लाखांचा फायदा
‘गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यास 6 लाखांचा मोफत विमा, इतर खर्चासाठी 4 लाख’, तुम्हाला ‘हे’ माहितीय?