income tax returns: कंपनीकडून फॉर्म 16 मिळाला नाही… मग या पद्धतीनेही मिळवा फॉर्म

| Updated on: Jul 18, 2024 | 1:36 PM

income tax return filing date and tds: फॉर्म 16 मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापण्यात आलेल्या टीडीएसचे विवरण असते. मग जास्तीचा आयकर कापला गेला असेल किंवा आयकर मुक्त उत्पन्न असेल तर त्यासाठी टीडीएस प्रमाणपत्र म्हणजेच फॉर्म 16 ए आवश्यक असते. ते उपलब्ध नसल्यास बँकेच्या वेबसाइटवरुन फॉर्म 16 ए डाऊनलोड करता येते.

income tax returns: कंपनीकडून फॉर्म 16 मिळाला नाही... मग या पद्धतीनेही मिळवा फॉर्म
Follow us on

जुलै महिना सुरु झाल्यावर आयकर परताव्यासाठी लगबग सुरु होते. सीए आणि कर सल्लागारांकडे आयकर परतावा भरण्यासाठी गर्दी असते. अनेक जणांचा उत्पन्नावरील कर वजावटीसाठी टीडीएस कापला जातो. मग हा टीडीएस परत मिळवण्यासाठी फॉर्म 16 हवा असतो. परंतु अनेक कंपन्यांकडून हा फार्म मिळण्यास दिरंगाई होते की काही कर्मचाऱ्यांना मिळत नाही. आता कंपनीकडून फॉर्म 16 मिळाले नाही तर चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या मदतीसाठी बँका धावून येत आहे. बँकेमार्फत तुम्हाला हा फॉर्म 16 मिळवता येणार आहे. तुम्हाला तुमच्या बँकेच्या वेबसाईटवरुन फॉर्म 16 ए डाऊनलोड करता येणार आहे.

काय असतो फॉर्म 16

फॉर्म 16 मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापण्यात आलेल्या टीडीएसचे विवरण असते. मग जास्तीचा आयकर कापला गेला असेल किंवा आयकर मुक्त उत्पन्न असेल तर त्यासाठी टीडीएस प्रमाणपत्र म्हणजेच फॉर्म 16 ए आवश्यक असते. ते उपलब्ध नसल्यास बँकेच्या वेबसाइटवरुन फॉर्म 16 ए डाऊनलोड करता येते. स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्या बेवसाइटवर तो उपलब्ध आहे. बँकांनी या सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे अनेकांचे काम सुरळीत होणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आयकर मर्यादा वाढेल का? याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

असा करा फार्म डाऊनलोड

एसबीआय

हे सुद्धा वाचा
  • एसबीआय बँकेच्या आपल्या खात्यात लॉगीन करा.
  • माय सर्टिफिकेट्स पर्यायावर जाऊन ई सर्व्हिसेसचा पर्याय निवडा
  • इंटरेस्ट सर्टिफिकेट ऑन डिपॉझिट अकाऊंट्सवर क्लिक करा.
  • आर्थिक वर्ष निवडून फार्म 16 ए ची पीडीएफ डाऊनलोड करा.

एचडीएफसी

  • एचडीएफसी बँकेच्या बेबसाईटवर लॉगीन करा.
  • इन्क्चायरीवर जाऊन टीडीएस इन्क्चायरीवर क्लिक करा.
  • आर्थिक वर्ष निवडल्यानंतर फार्म 16 ए डाऊनलोड करता येईल.

आयसीआयसीआय

  • आयसीआयसीआय बँकेच्या बेवसाइटवर जाऊन लॉगीन करा.
  • टॅक्स सेंटरवर पेमेंट्स अँड ट्रान्सफर पर्याय निवडा.
  • टीडीएस सर्टिफिकेटवर क्लिक करा.
  • पॅन कार्ड तपशील भरा. टीडीएस प्रमाणपत्राची पीडीएफ डाऊनलोड करा.