LPG Cylinder वर सूट मिळवण्याची सॉलिड आयडिया, 300 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळणार

आधार कार्डद्वारे LPG सबसिडी मिळवण्यासाठी आधार कार्ड बँक अकाऊंटशी लिंक करावं लागेल. त्यानंतर एलपीजी जोडणी आधार कार्डशी लिंक करावी लागेल.

LPG Cylinder वर सूट मिळवण्याची सॉलिड आयडिया, 300 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळणार
एलपीजीची सबसिडी राज्या-राज्यांनुसार वेगळी असते. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 10 लाख किंवा त्याहून अधिक आहे, त्यांना सबसिडी दिली जात नाही. 10 लाखांचे हे वार्षिक उत्पन्न पती-पत्नी दोघांच्या उत्पन्नातून गणले जाते.
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 12:59 PM

मुंबई : तुम्हाला स्वयंपाकाच्या गॅसची Subsidy मिळतेय का हे एकदा तपासून पाहा. जर तुम्हाला LPG वर मिळणारी सबसिडी मिळत नसेल तर याचा अर्थ कदाचित तुमचं आधार कार्ड लिंक (LPG Aadhaar Linking) नसेल. विविध राज्यांमध्ये LPG वरील सबसिडी वेगवेगळी आहे. ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा कुटुंबांना (यामध्ये पती आणि पत्नी दोघांचे उत्पन्न मोजले जाते.) ही सबसिडी दिली जात नाही. (how to get LPG subsidy, 4 Different Ways to Link Aadhaar with LPG)

या विभागातील अधिकाऱ्यांच्या मते सरकारने घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडी 153.86 रुपयांवरुन वाढवून 291.48 रुपये इतकी केली आहे. तसेच Pradhan Mantri Ujjwala Yojana (PMUY) मधील Subsidy 174.86 रुपयांवरुन वाढवून 312.48 रुपये इतकी केली आहे. जर तुम्हाला ही सबसिडी मिळतेय, तर याचा अर्थ तुम्हाला घरगुती गॅस सिलिंडर 300 रुपयांमध्ये मिळतोय.

आधार कार्डद्वारे LPG सबसिडी मिळवण्यासाठी आधार कार्ड बँक अकाऊंटशी लिंक करावं लागेल. त्यानंतर ग्राहकाला त्याची एलपीजी जोडणी आधार कार्डशी लिंक करावी लागेल. सर्वात आधी जाणून घ्या की तुमचा मोबाईल नंबर Indane गॅस एजन्सीकडे रजिस्टर्ड आहे का. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन IOC< गॅस एजन्सीच्या टेलिफोन नंबरचा STD कोड > टाईप करा आणि आता हा मेसेज कस्टमर केअर नंबरवर पाठवा. तुम्हाला जर तुमच्या गॅस एजन्सीचा नंबर माहिती नसेल तर तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर (https://cx.indianoil.in) जा. जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल तर तुम्ही थेट गॅस एजन्सीला मेसेज करुन तुमचा आधार नंबर लिंक करु शकता.

मेसेजचा पर्याय

तुमचा मोबाईल रजिस्टर झाल्यानंतर मेसेजमध्ये जाऊन UID <Aadhar number> टाईक करा आणि गॅस एजन्सीच्या नंबरवर पुन्हा पाठवा. असे करताच तुमचं गॅस कनेक्शन आधारशी लिंक होईल. तसेच याबाबतची माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे मिळेल.

कॉल करुन आधार लिंक करा

SMS शिवाय अजून एक पर्याय ग्राहकांकडे उपलब्ध आहे. Indane गॅस एजन्सीच्या नंबरवर (1800 2333 5555) तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन कॉल करा. तुमचा आधार नंबर कस्टमर केयर कर्मचाऱ्याला सांगा. तो तुमचा आधार क्रमांक गॅस कनेक्शनशी लिंक करेल.

UIDAI च्या वेबसाईटवरुन आधार लिंक करण्याचा पर्याय

UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा पत्ता आणि इतर माहिती भरा. स्किम टाइप, डिस्ट्रीब्यूटरचं नाव, Indane गॅस आयडी वगैरे. कॉन्टॅक्ट डिटेल्स भरल्यानंतर सबमिट बटणवर क्लिक करा. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल. ओटीपी देऊन अॅप्लिकेशन पूर्ण करा. त्यानंतर तुमचा आधार नंबर गॅस कनेक्शनशी लिंक होईल.

इतर बातम्या

स्वतः पेट्रोलियम मंत्र्यांनीही मान्य केलं, 7 वर्षात घरगुती गॅसची किंमत दुप्पट, पेट्रोल-डिझेलवरील करात 459 टक्के वाढ

फक्त 94 रुपयांमध्ये मिळेल गॅस सिलेंडर, आज आहे शेवटची संधी; ‘असा’ करा बूक

LPG Gas कनेक्शन घेतल्यावर सरकार देणार 1600 रुपये, तुम्हीही घेऊ शकता संधीचा लाभ

(how to get LPG subsidy, 4 Different Ways to Link Aadhaar with LPG)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.