लग्नानंतर आर्थिक गणित कसं मॅनेज करायचं? ‘या’ सोप्या टिप्स लक्षात ठेवा

लग्न झाल्यानंतर आर्थिक गणित मॅनेज करण्यासाठी कोणताही विशिष्ट नियम नसतो. त्यामुळे प्रत्येक विवाहित जोडप्याने स्वत: हे नियम ठरवू शकता. (How To Manage Finance After Marriage)

लग्नानंतर आर्थिक गणित कसं मॅनेज करायचं? 'या' सोप्या टिप्स लक्षात ठेवा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 31, 2021 | 3:37 PM

मुंबई : लग्न झाल्यानंतर आर्थिक स्थिती सांभाळताना अनेकांच्या नाकीनऊ येतात. विवाहानंतर पैसा कसा टिकवायचा, कसा, किती आणि कुठे खर्च करावा, पती-पत्नीने त्यांची मालमत्ता एकत्रित करावी की नाही? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. तसेच लग्नानंतर तुमच्या जोडीदारासह एकत्रित कर्ज घ्यायचे की नाही? लग्नानंतरचे आर्थिक व्यवहाराबद्दलचा निर्णय एकाने घ्यावा की दोघांनीही? असा देखील सवाल उपस्थित होतो. (How To Manage Finance After Marriage)

लग्न झाल्यानंतर आर्थिक गणित मॅनेज करण्यासाठी कोणताही विशिष्ट नियम नसतो. त्यामुळे प्रत्येक विवाहित जोडप्याने स्वत: हे नियम ठरवू शकता. मग लग्न झाल्यानंतर आर्थिक स्थिती मॅनेज करण्यासाठी या टीप्स नक्की उपयोगी ठरु शकता.

लग्नानंतर आर्थिक गणित मॅनेज करण्यासाठीच्या टिप्स

?निर्णयाची घाई नको

लग्न हे अतूट बंधन असते. त्यामुळे आपण कधीही वेगळे होणार नाही, असा विचार प्रत्येकजण करतो. मात्र भविष्यात जर काही कारणामुळे तुमचे नातेसंबंध तुटले तर त्यासाठी तयार असणे महत्वाचे आहे. यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासह पैसे किंवा मालमत्ता विलीन करण्याची घाई करु नका.

?लग्नानंतर प्रॉपर्टी विलीन करु नका

लग्नानंतर तुमच्या नात्याला काही वर्षे द्या. त्यात तुम्ही एकमेकांना चांगले समजून घ्या. लग्नानंतर 10-15 वर्षे तुमची मालमत्ता विलीन (Merge) करु नका. तसेच जोडीदाराच्या नावे कोणतेही कर्ज घेऊ नका. कारण जर भविष्यात तुमचे संबंध तुटले तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल.

?आर्थिक व्यवहाराचा निर्णय एकत्र घ्या

जर तुम्ही एकटे कमावत असाल किंवा दोघेही कमावते असाल तरीही आर्थिक व्यवहाराचा निर्णय हा एकत्रित घ्यावा. पैशांशी संबंधित निर्णय घेताना तुमच्या पार्टनरचे मत जाणून घ्या.

?जोडीदाराच्या आर्थिक व्यवहाराची माहिती असणे गरजेचे

जोडीदाराचा पगार किती? खर्च किती? त्यांनी कोणती पॉलिसी घेतली आहे? कुठे कुठे गुंतवणूक केली आहे? इत्यादी सर्व गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. म्हणजे जर काही कारणाने तुमच्या जोडीदाराचा अकस्मित मृत्यू झाला तर तुम्हाला त्याचे आर्थिक व्यवहार मॅनेज करता येईल. जर कमाई करणारा जोडीदार मरण पावला, तर त्याच्या विमासह इतर गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमचे आणि मुलांचे भविष्य सुखी होऊ शकते.

?बँक अकाऊंट बंद करु नका

लग्न झाले याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमचे बँक अकाऊंट बंद कराल किंवा तुमच्या पार्टनरचे बँक अकाऊंट बंद कराल. तसेच तुमच्या दोघांचे संयुक्त खाते असावे, असाही हट्ट करु नका. तसेच तुम्ही केलेली बचत किंवा एखादी पॉलिसीही जाईंट किंवा रद्द करु नका.

?तुमच्या वस्तू तुमच्याच नावे ठेवा

जे तुमच्या मालकीचे आहे ते तुमच्याकडेच ठेवा. त्यामध्ये जोडीदारास भागीदार बनवण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जर तुमच्या पत्नीला तिच्या पालकांनी लग्नापूर्वी एखादी गाडी घेऊन दिली असेल तर ती तिच्याच नावे ठेवावी. ती गाडी पतीच्या नावे करणे गरजेचे नाही. (How To Manage Finance After Marriage)

संबंधित बातम्या : 

सरकारी कर्मचारी मालामाल, 1 जुलैपासून मोठी पगारवाढ, महिन्याचा पगार किती हजारांनी वाढणार?

HDFC बँकेच्या FD च्या व्याजदरात बदल, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.