आपत्कालीन परिस्थितीत पैशांची व्यवस्था कशी करावी? जाणून घ्या हे 3 मार्ग
कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेने लोकांसाठी पुन्हा आर्थिक समस्या निर्माण केल्या आहेत. सर्वात मोठी समस्या म्हणजे पैशांची. (How to manage money in an emergency, know these 3 ways)
नवी दिल्ली : कोरोनामुळे राज्यातील सर्व क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेने लोकांसाठी पुन्हा आर्थिक समस्या निर्माण केल्या आहेत. सर्वात मोठी समस्या म्हणजे पैशांची. बर्याच लोकांच्या घरातील खर्च वाढवण्यासह त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पुरेसा पैसाही नसतो. राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागत असल्यामुळे आर्थिक प्रश्न पुन्हा आ वासून उभा राहणार आहे. अशा वेळी, आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला पैसे हवे असतील तर ते कसे मिळतील, यासंदर्भात आज आम्ही आपल्याला 3 पर्यायांबद्दल सांगणार आहोत जे आपल्याला कठीण परिस्थितीत मदत करतील. (How to manage money in an emergency, know these 3 ways)
क्रेडिट कार्डवर घेऊ शकता त्वरीत कर्ज
आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला पैशांची आवश्यकता असल्यास आपण क्रेडिट कार्डवर कर्ज घेऊ शकता. तथापि, यासाठी आपली क्रेडिट हिस्ट्री चांगली असली पाहिजे. जर आपण आतापर्यंत क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले असेल तर आपला स्कोअर चांगला असेल. याच आधारे, क्रेडिट कार्ड कंपन्या आपल्याला कार्ड मर्यादेपेक्षा अधिक त्वरित कर्ज देऊ शकतात.
पीपीएफ खात्यातून काढू शकता पैसे
भविष्यात चांगले रिटर्न मिळविण्यासाठी आपण पीपीएफ खात्यात गुंतवणूक केली तर अडचणीच्या वेळी हे उपयोगी ठरु शकते. जर आपल्या खात्याला तीन वर्षे पूर्ण झाली असतील तर आपण त्यामध्ये कर्जासाठी अर्ज करु शकता. कर्ज खात्यात जमा झालेल्या रकमेच्या 25 टक्के रक्कम आपण मिळवू शकता.
आपण सोन्यावर घेऊ शकता कर्ज
आणीबाणीच्या वेळी घरात ठेवलेले सोने अत्यंत उपयुक्त ठरु शकते. तारण ठेवून आपण त्वरीत कर्ज घेऊ शकता. मध्यवर्ती बँक आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोन्याचे दागिने किंवा सोन्याच्या नाण्याच्या किंमतीच्या 90 टक्के इतके कर्ज घेतले जाऊ शकते. अशा परिस्थितीत आपण सोने बँकेत तारण ठेवून पैसे घेऊ शकता. वैयक्तिक कर्जांच्या तुलनेत गोल्ड लोनचा व्याजदर कमी आहे. शिवाय इतर कर्जाच्या तुलनेत सोने गहाण ठेऊन त्यावर झटपट कर्ज मिळते. सोने तारणावर 8 ते 12 टक्के व्याजाने कर्ज मिळवले जाऊ शकते. (How to manage money in an emergency, know these 3 ways)
Corona Vaccine : आतापर्यंत जवळपास 50 लाख कोरोना लसीचे डोस खराब, RTI मध्ये धक्कादायक माहिती https://t.co/C0SBAOFFzc @PMOIndia @drharshvardhan @CMOMaharashtra @OfficeofUT @rajeshtope11 @PrakashJavdekar #CoronaVaccine #CoronaVaccineShortage #VaccineWastage #VaccinationDrive #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 20, 2021
इतर बातम्या
हे पहिल्यांदा झालंय, सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला : जितेंद्र आव्हाड