मुंबई : कोरोना काळात लाखो लोकांचा रोजगार हिरावला आहे. अनेक लोक शहर सोडून आपल्या गावी परतले आहेत. यातील काही जण रोजगारासाठी व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात आहे. जर तुम्हीही हाच विचार करत असाल, तर तुम्ही सॅनिटरी नॅपकिन बनविण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. (How to start your own sanitary napkin business Know All the Details)
सॅनिटरी नॅपकिन हा असा व्यवसाय आहे ज्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त जागेची आवश्यकता नसते. अगदी एका रुममध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरु करु शकता. तुम्ही हा व्यवसाय कसा सुरु करु शकता, यासाठी किती भांडवल लागते याची माहिती जाणून घेऊया.
सॅनिटरी नॅपकिन युनिट बसवण्यासाठी तुम्हाला फार कमी खर्च येतो. हे युनिट बसवण्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातील फक्त 15,000 रुपये गुंतवावे लागतील. तर उर्वरित पैसे तुम्ही सरकारच्या मुद्रा कर्ज योजनेतून (Mudra Loan Scheme) घेऊ शकता. या माध्यमातून तुम्ही वर्षभरात 1 लाख 10 हजार रुपयांचा नफा कमावू शकता. विशेष म्हणजे पुढच्या प्रत्येक वर्षात तुमचा नफा हमखास वाढू शकतो.
व्यवसाय सुरु करण्यासाठी ‘हे’ गरजेचे
नुकतंच सरकारने सॅनिटरी नॅपकिन व्यवसायाचा एक प्रकल्प तयार केला आहे. जर तुम्हालाही सॅनिटरी नॅपकिनचा एक छोटासा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 16×16 चौरस फूट एका खोलीची गरज आहे. यात तुम्ही सॅनिटरी नॅपकिन युनिट बसवू शकता.
या यंत्राद्वारे दररोज 180 पॅकेट्स तयार केले जातील. तर हे युनिट बसवण्यासाठी साधारण 1.45 लाख रुपये खर्च होईल. यातील 90 टक्के म्हणजेच 1.30 लाख रुपये तुम्हाला मुद्रा योजनेतून घेता येऊ शकतात.
या प्रकल्पाच्या एका अहवालानुसार, सॅनिटरी नॅपकिन युनिटसाठी सॉफ्ट टच सीलिंग मशीन, नॅपकिन कोअर डाय, यूव्ही ट्रीट युनिट, डिफायबरेशन मशीन, कोअर मॉर्निंग मशीन बसवावे लागेल. याची किंमत 70,000 रुपये असेल. या मशीन विकत घेतल्यानंतर लाकडाचा लगदा, टॉप लेयर, बॅक लेयर, रिलीझ पेपर, गम, पॅकिंग कव्हर यासारख्या कच्च्या मालाची व्यवस्था करावी लागेल. हा कच्चा माल खरेदीसाठी 36,000 रुपये खर्च येतो.
जर तुमचे युनिट वर्षामध्ये 300 दिवस जरी कार्य असेल तर जवळजवळ 54,000 सॅनिटरी नॅपकिन पॅकेट तयार केले जाऊ शकतात. अशा पॅकेटच्या उत्पादनावर वर्षभरात जवळपास 5 लाख 90 हजार रुपये खर्च केले जातील. या अहवालातील अंदाजानुसार जर तुम्ही घाऊक बाजारात सॅनिटरी नॅपकिनचा एक पॅक 13 रुपये किंमतीला विकला तरी तुमची एकूण विक्री 7 लाख रुपये होईल. त्यानुसार तुमचा एकूण नफा 1 लाख रुपयांपेक्षा जास्त होईल. (How to start your own sanitary napkin business Know All the Details)
सोन्याचा दर पुन्हा गगनाला भिडणार; वर्षाअखेरीस सोन्याचा प्रतितोळा भाव किती?https://t.co/MJ23niuzbq #GoldPriceUpdate #Goldprice
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 7, 2021
संबंधित बातम्या :
सोन्याचा दर पुन्हा गगनाला भिडणार; वर्षाअखेरीस सोन्याचा प्रतितोळा भाव किती?
Petrol Diesel Price | इंधन दरवाढीचा भडका, महाराष्ट्रात पेट्रोल शंभरी पार, नवे दर काय?
लाखभर पगार असूनही बचत शून्य, जाणून घ्या गुंतवणूकीच्या सोप्या टिप्स