Tokenization : टोकनायझेशन करायचंय, मग ही सोप्पी पद्धत वापरा की राव..

Tokenization : टोकनायझेशन तर करायचंय, पण कसे करता ते माहिती नसेल तर ही सोपी पद्धत वापरा..

Tokenization : टोकनायझेशन करायचंय, मग ही सोप्पी पद्धत वापरा की राव..
टोकनायझेशनची ही सोपी पद्धतImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 8:58 PM

नवी दिल्ली : डेबिट आणि क्रेडिट कार्ड (Debit-Credit Card) संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 1 ऑक्टोबरपासून नियम बदलले आहेत. त्यानुसार, ऑनलाईन पेमेंट अथवा अॅपच्या माध्यमातून व्यवहार करताना डेबिट-क्रेडिट कार्डच्या डाटाला युनिक टोकनायझेशनमध्ये (Tokenization) बदलावा लागणार आहे. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक होणार नाही आणि व्यवहार सुरक्षित राहतील.

या सुविधेमुळे ग्राहकांना त्यांचा वैयक्तिक आणि कार्डचा तपशील दुकानदार अथवा मर्चंट वेबसाईटला देण्याची गरज उरली नाही. टोकनायझेशनमुळे ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार करताना सुरक्षा मिळणार आहे. तसेच कार्डचा तपशील, डाटा लिक होण्याची भीती दूर होणार आहे.

टोकनायझेशनचा अर्थ डेबिट अथवा क्रेडिट कार्डची मुळ माहिती एका कोडमध्ये बदलणे होय. मुळ तपशील कोडमध्ये बदलण्यात येतो. कोडलाच टोकन म्हणतात. या टोकनमध्ये कोर्डचा तपशील देण्यात येतो. ही माहिती डेबिट-क्रेडिट कार्ड कंपन्यांकडे पाठवण्यात येतो.

हे सुद्धा वाचा

या कंपन्या हा तपशील कोडमध्ये रुपांतर करतात. ही प्रक्रिया काही सेकंदात पूर्ण होते. त्यामुळे ग्राहकांना या प्रक्रियेत कुठलाही उशीर होत नाही. आरबीआयने टोकनायझेशनसाठी 6 स्टेप्स सांगितल्या आहेत, ते पाहुयात..

  1. ज्या ठिकाणाहून खरेदी करायची आहे, अशा कोणत्याही ई-कॉमर्स मर्चंट वेबसाईट वा अॅपवर जा. याठिकाणी पेमेंटची प्रक्रिया सुरु करा
  2. तुमच्या कार्डचा पर्याय निवडा. चेकआऊट करताना यापूर्वी जतन, सेव्ह केलेल्या डेबिट-क्रेडिट कार्डचा तपशील टाका आणि इतर माहिती द्या
  3. कार्डची माहिती सुरक्षित करा. त्यानंतर ‘सिक्योर योर कार्ड अॅझ पर आरबीआई गाइडलाइन’ अथवा टोकनाइज योर कार्ड अॅझ पर आरबीआई गाइडलाइन हा पर्याय निवडा
  4. टोकनसाठी सहमती द्या. बँकेकडून तुमचा मोबाईल अथवा ई-मेलवर ओटीपी पाठवण्यात येईल. हा ओटीपी क्रमांक टाकून व्यवहार पूर्ण करा.
  5. त्यानंतर टोकन जनरेट करा. टोकन जनरेट होईल. तो सेव्हही होईल. तुम्ही दिलेला तपशील टोकन रुपात बदलले. त्यानंतर जेव्हाही तुम्ही संबंधित वेबसाईटवर जाला. तेव्हा तुमच्या कार्डचे शेवटचे चार आकडे दिसतील. हेच टोकनायझेशन आहे.

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.