‘मी अनेकदा टॉयलेट केले स्वच्छ’, NVIDIA CEO ने केले आत्मकथन; जाणून घ्या Elon Musk याची रिॲक्शन
NVIDIA या जागतिक कंपनीचे सीईओ जेन्सेन हुआंग यांनी त्यांच्या संघर्ष काळातील अनुभव कथन केले होते. त्यावेळी त्यांनी टॉयलेट स्वच्छ करण्याचे काम केल्याचा अनुभव त्यांनी सांगितला होता. त्यावर एलॉन मस्कची अतरंगी प्रतिक्रिया आली आहे.
एआय चिप तयार करणारी अमेरिकन कंपनी एनव्हिडिया (Nvidia) कंपनीचे सीईओ जेन्सेन हुआंग यांनी त्यांचा संघर्ष जगासमोर आणला. एका मुलाखतीत त्यांनी अमेरिकेत आल्यानंतर शिक्षण घेण्यासाठी त्यांना काय काम करावं लागले याचे कथन केले होते.स्टँडफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसच्या मुलाखतीत त्यांनी कोणतेही काम छोटे नसल्याचे सांगितले. त्यावर आता टेस्लाचा सीईओ आणि ट्विटरचा(एक्स) मालक एलॉन मस्क याने अतरंगी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे युझर्संनी डोक्याला हात लावला आहे.
कसा होता संघर्ष
एनव्हिडियाचे मालक जेन्सेन हुआंग यांनी त्यांचा संघर्ष पट उलगडून दाखवला. शिक्षणाचा खर्च पूर्ण करण्यासाठी त्यांना काही महिने Denny’s रेस्टॉरंटमध्ये वेटरचे काम करावे लागले. त्यांना कधी टॉयलेट स्वच्छ करावे लागले तर कधी दुसऱ्याचे कपडे त्यांनी धुतले. स्टँडफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसच्या मुलाखतीत त्यांनी कोणतेही काम छोटे नसल्याचे सांगितले.आर्थिक गरजा भागविण्यासाठी कधी भांडी घासली तर कधी संडास साफ केल्याचे त्यांनी सांगितले.
एलॉन मस्कची प्रतिक्रिया काय
एलॉन मस्क याने Jensen Huang याने या मुलाखतीवर खास प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हुआंग यांच्या कामाचे कौतुक केले. X वर शेअर केलेल्या व्हिडिओवर एकदम योग्य दृष्टिकोन असल्याची प्रतिक्रिया दिली. कोविड दरम्यान टेस्लाच्या फॅक्टरीत टॉयलेट पेपरची कमी असताना, टॉयलेट पेपर कमी पडू नये याची आपण खूप काळजी घेतल्याची अतरंगी प्रतिक्रिया मस्क याने दिली. आता त्याच्या या प्रतिक्रिया हसावे की रडावे असा प्रश्न युझर्सला पडला आहे.
भारतीय अभियंत्याचे कौडकौतुक
एलॉन मस्क याने भारतीय अभियंता अशोक एलुस्वामी याचे कौडकौतुक केले आहे. अशोक हे टेस्लाच्या Autopilot टीमचे पहिले सदस्य आहेत. अशोक नसता तर आम्हाला दुसऱ्या एखाद्या कंपनीसोबत पार्टनरशिप करत Autopilot प्रकल्प उभारावा लागला असता, अशी प्रतिक्रिया मस्क याने दिली आहे. ज्या गोष्टी आम्हाला अशक्य असल्याचे वाटत होते, ते अशोक यांनी लिलया केल्याचे कौतुक मस्क याने केले.